Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अग्रवाल कुटुंबाचे पाय अजून खोलात, घरातील सुनेला हात घातल्याची केस आली समोर, नेमकं काय आहे प्रकरण?

अग्रवाल कुटुंबाचे पाय अजून खोलात, घरातील सुनेला हात घातल्याची केस आली समोर, नेमकं काय आहे प्रकरण?


पुण्यात अग्रवाल कुटुंबातील अल्पवयीन मुलाने दारुच्या नशेत कल्याणीनगरमध्ये मध्यरात्री रस्त्यावर दोघांना चिरडून मारल्यानंतर सगळे संताप व्यक्त करत आहेत. यामुळे राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलं आहे. यानंतर पोलिसांनी देखील प्रकरण मिटवायचा प्रयत्न केला. यामुळे जीव इतका स्वस्त झाला आहे का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

पुण्यातील आमदारावरही आरोप होत आहेत. आता या प्रकरणांमध्ये सर्वच पातळीवरून दबाव आल्यानंतर कारवाईने वेग पकडला आहे. आता अग्रवाल कुटुंबांमधील एक एक प्रकरणे समोर येत आहेत. अग्रवाल कुटुंबाचे अंडरवर्ल्डशी संबंध समोर आल्यानंतर आता कुटुंबामध्ये असलेला वाद सुद्धा समोर आला आहे.
या कुटुंबातील राम कुमार अग्रवालशी जवळचे संबंध असलेल्या माजी नगरसेवक अजय भोसले यांच्या हत्येची भाऊ सुरेंद्र कुमार अग्रवालकडून देण्यात आली होती. अशी माहिती समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ज्यांच्या हत्येचा प्रयत्न झाला त्या अजय भोसले यांनी अग्रवाल फॅमिलीची सगळीच माहिती दिली आहे. अजय भोसले यांचे राम अग्रवाल यांच्याशी संबंध होते आणि जिवलग मित्र असल्याने सुरेंद्र कुमार अग्रवालने हत्येची सुपारी देण्यात आली होती.

भोसले म्हणाले की, त्यांच्यामध्ये पैशावरून वाद सुरू होता आणि हा वाद काही हजार कोटींमध्ये होता. याच वादादरम्यान राम कुमार अग्रवालने सुनेला हात घातल्याची तक्रार सुरेंद्र कुमार अग्रवालने पोलिस ठाण्यामध्ये दिली होती. सुनेच्या मदतीनेच ही केस करण्यात आली होती.
यामुळे राम कुमार हा कुटुंबासह फरार झाला होता. अटकपूर्व जामीन घेतल्यानंतर तो परत आला होता. पैसेवाले असल्याने सगळे विकत घेऊ शकतो, असा त्यांचा समज होता. ते कोणत्याही खात्यात गेल्यास त्यांना व्हीआयपी ट्रिटमेंट दिली जाते, असेही त्यांनी सांगितले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.