Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ब्रेकिंग न्यूज ! घाटकोपर दुर्घटनेतील आरोपी भावेश भिडे कुटूंबासह फरार

ब्रेकिंग न्यूज ! घाटकोपर दुर्घटनेतील आरोपी भावेश भिडे कुटूंबासह फरार 


मुंबई : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी फरार झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे. घाटकोपर दुर्घेटनेतील आरोपी भावेश भिंडे कुटूंबाला घेऊन फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी भावेश भिंडे याचा आता पोलिसांकडून शोध सुरू आहे.


भावेश भिंडे मुलूंड पश्चिमेला आशिष टॉवरमध्ये रहायला होता. मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून सोमवारी मोठी दुर्घटना घडली. होर्डिंग दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला आहे, तर होर्डिंगखाली अडकलेल्या 74 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. 43 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. घाटकोपरच्या पोलीस मैदानावरील पेट्रोल पंपावर 250 टन वजनाचे बेकायदेशीर जाहिरात होर्डिंग अचानक वादळानंतर कोसळलं. या दुर्घटनेमुळे अनेक जणांचे संसार उघड्यावर पडले आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.