Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शिंदे गटात वादच्या ठिणग्या :, कीर्तिकरांचीं हाकलपट्टी करा,मुख्यमंत्र्यांना पत्र

शिंदे गटात वादच्या ठिणग्या :, कीर्तिकरांचीं हाकलपट्टी करा,मुख्यमंत्र्यांना पत्र 


मुंबई : देशातील लोकसभेच्या पाच टप्प्यांच्या निवडणुका पार पडल्या आहेत. राज्यातील सर्व जागांवरील निवडणुका पार पडल्या आहेत. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून गजानन कीर्तिकर यांचे सुपुत्र अमोल कीर्तिकर यांनी ठाकरे गटाकडून निवडणूक लढवली.
या मतदारसंघात मतदान प्रक्रिया देखील पार पडली आहे. या मतदारसंघातील मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर गजानन कीर्तिकर यांनी माझा मुलगा ना नगरसेवक, ना आमदार ना डायरेक्ट खासदार होणार, असं वक्तव्य केलं. त्यानंतर शिंदे गटात अंतर्गत कलह पेटल्याची चर्चा आहे. या वक्तव्यानंतर शिंदे गटाचे नेते शिशिर शिंदे यांनी गजानन किर्तीकरांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.

शिंदे गटाचे नेते शिशिर शिंदे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून माजी खासदार गजानन किर्तीकर यांची पक्षातून त्वरीत हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे. तसेच त्यांना निरोपाचा नारळ द्यावा, अशीही मागणी केली आहे.
शिशिर शिंदे यांनी पत्रात म्हटलं की, 'गजानन कीर्तिकर यांनी पक्षविरोधी वक्तव्य केल्या प्रकरणी त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी. लोकसभेच्या निवडणुकीत मतदानाच्या दिवशी कीर्तिकर आणि त्यांच्या पत्नी यांनी पक्ष विरोधी वक्तव्य केलं. त्यांनी ठाकरे गटाची बाजू घेतली. त्यामुळे त्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवावा'.

'कीर्तिकर यांचे चिरंजीव अमोल यांना ठाकरे गटाने उत्तर-पश्चिम मुंबईतून उमेदवारी दिली. त्यानंतर अमोल हे गजानन कीर्तिकरांच्या कार्यालयातून कारभार करत होते. गजानन कीर्तिकर शिवसेनेत असताना त्यांचा निधी अमोल कीर्तिकर यांनी त्यांच्या प्रचारासाठी विकासकामांसाठी वापरला. त्यामुळे शिवेसेनेला शून्य लाभ झाला. त्याचा फायदा ठाकरे गटाला झाला, असे ते म्हणाले.
उल्लेख करत ठाकरे गटाची बाजू घेतली होती. कीर्तिकरांना मातोश्रीवर लोटांगण घालण्याची घाई झालेली आहे. त्यांचे उद्योग पक्षाला बदनाम करत आहेत. त्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी. त्यांना निरोपाचा नारळ द्यावा, अशी मागणी शिशिर शिंदे यांनी केली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.