Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ब्रेकिंग न्यूज! विशाल अग्रवालच्या वडिलांचे छोटा राजनशी संबंध, खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात पोलीसांचा या अगोदरही वरदहस्त

ब्रेकिंग न्यूज! विशाल अग्रवालच्या वडिलांचे छोटा राजनशी संबंध, खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात पोलीसांचा या अगोदरही वरदहस्त 


पुणे कार अपघातात एक धक्कादायक खुलासा झाला असून अग्रवाल कुटुंबीयांना पोलिसांचा वरदहस्त हा काही नवा नसल्याचं समोर आलं आहे. तसेच अग्रवाल कुटुंबीयांचं अंडरवर्ल्ड कनेक्शन समोर आलं असून त्यासंबंधी एबीपी माझीकडे एक्सक्लुझिव्ह माहिती आहे. विशाल अग्रवाल यांचे वडील सुरेंद्र कुमार अग्रवाल यांचे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनशी संबंध असल्याची माहिती उघड झाली आहे.

पुण्यात दारूच्या नशेत गाडी चालवून दोन जणांचा जीव घेणाऱ्या वेदांत अग्रवाल या अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्या कुटुंबीयांची छोटा राजनसोबत संबंध असल्याचं उघड झालं आहे.खुनाच्या गुन्ह्यात पोलिसांचा वरदहस्त

भावांसोबत असलेल्या संपत्तीच्या वादात वेदांत अग्रवालच्या आजोबांनी छोटा राजनची मदत घेतली होती. या प्रकरणी अजय भोसले नावाच्या व्यक्तीच्या हत्येच्या प्रयत्नामध्ये सुरेंद्र कुमार अग्रवाल यांच्याविरोधात बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचं समोर आलं आहे.

मात्र या प्रकरणात मोक्का लावणं अपेक्षित असनाताही पुणे पोलीसांनी केवळ आयपीसीची कलमं लावून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. आरोपत्रही दाखल करेपर्यंत विशाल अग्रवालचे वडील सुरेंद्र कुमार अग्रवाल यांना अटक झाली नव्हती.

नातवाची हमी देणाऱ्या आजोबाचे अंडरवर्ल्ड संबंध

वेदांत अग्रवालची हमी देण्यासाठी आलेल्या त्याच्या आजोबांचे, सुरेंद्र अग्रवालांचे संबंध हे थेट छोटा राजनशी असल्याचं समोर आलं आहे. सन 2007-08 च्या दरम्यानचं एक प्रकरण समोर आलं आहे. मुंबई सत्र न्यायालयात छोटा राजनशी संबंधित सर्व प्रकरणं सीबीआयकडे हस्तक्षेप करण्यात आली होती. त्यामध्ये या प्रकरणाचा समावेश आहे.

या प्रकरणी सुरेंद्र अग्रवाल यांनी छोटा राजनचा हस्तक असलेल्या विजय तांबट याची बँकॉक येथे जाऊन भेट घेतली होती. भावासाोबत असलेल्या संपत्तीच्या वादात राजनने आपल्याला मदत करावी अशी मागणी त्यांनी केली होती. नंतर अजय भोसले या व्यक्तीच्या खुनाच्या प्रयत्नात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणात पोलिसांनी मोक्का लावणे अपेक्षित असताना फक्त आयपीसी कलम लावण्यात आली होती. तसेच चार्जशीट दाखल होईपर्यंत सुरेंद्र अग्रवाल यांना अटकही करण्यात आली नव्हती. नंतर छोटा राजनला भारतात आणल्यानंतर त्याच्याशी संबंधित सर्व प्रकरणं ही सीबीआयकडे ट्रान्सफर करण्यात आली. त्यामध्ये सुरेंद्र अग्रवालांचे हे प्रकरण असल्याचं आता उघड झालंय.

दारूच्या नशेत गाडी भरधाव वेगाने चालवणाऱ्या अल्पवयीन वेदांत अग्रवालला तुरुंगात रॉयल ट्रीटमेंट मिळाली आणि 15 तासांमध्ये जामीन मंजूर झाला. पण या आधीही त्याच्या आजोबांच्या बाबतीतही पोलिसांनी विशेष प्रयत्न करून त्यांना मदत केल्याचं आता स्पष्ट झालं आहे. त्यामुळे अग्रवाल कुटुंबीयांवर पुणे पोलिसांचा आधीपासूनच वरदहस्त असल्याचं समोर आलंय.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.