Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

' सैतानी श्वास ', असं औषध ज्याचा वास घेताच दागिने, पैसे सगळं देऊन टाकतात लोक

' सैतानी श्वास ', असं औषध ज्याचा वास घेताच दागिने, पैसे सगळं देऊन टाकतात लोक 


मुंबई : तुम्ही चोरीच्या अनेक घटना आजवर ऐकल्या असतील. काही ठिकाणी घरात कोणीच नसल्याचा फायदा उठवला जातो, तर काही ठिकाणी धमकावून चोरी केली जाते. पण आता अशा घटना उघडकीस येत आहेत, ज्यामध्ये धमकी न देता, कोणतीही जबरदस्ती न करता व्यक्ती आपल्या जवळचे दागिने, पैसे अथवा मौल्यवान वस्तू चोरांना नेऊन देते. तुम्हाला यावर विश्वास बसत नसेल, पण हे खरं आहे.
बांगलादेशात चोरट्यांनी नवीन पद्धत वापरून लोकांना लुटणं सुरू केलं आहे. यात ते एखाद्या व्यक्तीकडे पत्ता विचारण्यासाठी किंवा इतर कारणाने जातात आणि त्यांच्याकडील सर्व दागिने आणि पैसे लांबवतात. विशेष म्हणजे ती व्यक्तीही आपल्या घरातलं मौल्यवान सामान स्वतः चोरट्यांना देते. चोर ते लुटून किंवा जबरदस्ती करून नेत नाही. चोरटे ज्या औषधाच्या मदतीने अशी गुन्हेगारी कृत्ये करत आहेत, त्याला शैतानी श्वास देखील म्हणतात.

फसवणुकीची नवीन पद्धत

मागच्या काही काळापासून बांगलादेशमध्ये एका औषधाच्या माध्यमातून लोकांची फसवणूक करून त्यांना लुटलं जात आहे. ज्यामध्ये कागद किंवा एखाद्या वस्तूवर औषध टाकून पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तिथून जाणाऱ्या लोकांच्या नाकाजवळ ते नेलं जातं. या वासाने काही सेकंदातच व्यक्तीचे भान हरपते. यानंतर तिच्याकडे ठेवलेले दागिने, पैसे किंवा कोणत्याही वस्तू मागितल्या तरी ती व्यक्ती स्वतःहून चोरांना देते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे समोरचा माणूस चोर आहे हे माहीत असूनही ती व्यक्ती आपल्या सर्व किमती वस्तू त्यांच्या हातात ती व्यक्ती देते. नंतर शुद्धीवर आल्यावर आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येतं.

डेव्हिल्स ब्रेथ म्हणजे काय?
बीबीसीच्या रिपोर्टनुसार, डेव्हिल्स ब्रेथ पावडर आणि लिक्विड या दोन्ही स्वरूपात उपलब्ध आहे. याला स्कोपोलामाइन असंही म्हणतात. गुन्हेगारी हेतूने वापरणारे लोक हे औषध कागदावर, कापडावर, हातावर किंवा मोबाईलच्या स्क्रीनवर लावू शकतात, या वासाने काही काळ ते कोणाच्याही मनावर नियंत्रण मिळवू शकतात. याच्या वापराने केल्या जाणाऱ्या फसवणुकीची प्रकरणं ऐकून बांगलादेश पोलिसांनाही काही समजलं नव्हतं. मात्र कोर्टाच्या आदेशनानंतर सीआयडी चौकशी करण्यात आली आणि त्यात या औषधाचा खुलासा झाला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.