Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आता हँगओवरला म्हणा बाय बाय :, शास्त्रज्ञानी शोधलं ' हे ' जेल

आता हँगओवरला म्हणा बाय बाय :, शास्त्रज्ञानी शोधलं ' हे ' जेल 


पार्टी झाली आणि पण सकाळी उठल्यावर डोकं दुखतंय, मळमळतंय? अशावेळी मदत करणारे नवीन जेल शास्त्रज्ञांनी बनवले आहे! स्विट्झरलॅंडच्या संशोधकांनी मिल्क प्रोटीन्स और गोल्ड नैनोपार्टिकल्स पासून बनवलेले हे जेल एक महत्वपूर्ण संशोधन ठरणार आहे. "Nature Nanotechnology" या ज्येष्ठ वैज्ञानिक नियतकालिकात प्रकाशित झालेल्या या संशोधनानुसार हे जेल मद्यपान केल्याने होणारा 'हॅंगओवर' टाळण्यास मदत करू शकते.


हे जेल कसे काम करते?

हे जेल आपण मद्यपान केल्यानंतर पोटात जाणाऱ्या अल्कोहोलला रोखते. त्यानंतर ते अल्कोहोलचे रूपांतर कमी-विषारी 'एसेटिक ऍसिड' मध्ये करते. यामुळे शरीरात 'अॅसिटाल्डीहाइड' नावाचे रसायन तयार होत नाही. हे 'अॅसिटाल्डीहाइड'च डोके दुखणे, मळमळ होणे आणि थकवा या 'हॅंगओवर'च्या त्रासांचे मुख्य कारण आहे.
संशोधनादरम्यान, उंदीरांना हे जेल दिले असता त्यांच्या रक्तातील अल्कोहोलची पातळी ५०% पर्यंत कमी झाली. इतकेच नव्हे तर फक्त मद्यपान केलेल्या उंदीरांपेक्षा या जेल घेतलेल्या उंदीरांचे यकृत ( liver) चांगले कार्यरत होते आणि त्यांचे वजनही कमी झाले नाही.

"सर्वात आरोग्यदायी मार्ग म्हणजे मद्यपान टाळणे किंवा मर्यादा पाळणे हाच आहे." असे या संशोधनाचे प्रमुख शास्त्रज्ञ राफेल मेझेंगा यांनी सांगितले. "पण तरीही, जे कधीकधी मद्यपान करतात त्यांना या जेलमुळे मद्यपान केल्यावर होणारा त्रास टाळता येऊ शकेल."
 जेल अजून मानवी चाचण्यांच्या टप्प्यापासून खूप दूर आहे. पण भविष्यात 'हॅंगओवर' टाळण्यासाठी हे संशोधन आशेचा किरण असेल. मद्यपान करण्यापूर्वी किंवा करताना घेतलेल्या या जेलमुळे मद्यपान केल्यावर होणाऱ्या त्रासांमध्ये मोठी घट होऊ शकते अशी अपेक्षा शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.