Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

रेव्ह पार्टीत पकडली गेली प्रसिद्ध अभिनेत्री?

रेव्ह पार्टीत पकडली गेली प्रसिद्ध अभिनेत्री? 


चित्रपटसृष्टीतील कलाकार पैसे प्रसिद्धी तर मिळवतातच पण त्यातून अनेकजण चुकीच्या मार्गावर देखील जातात. एका अभिनेत्रीविषयी अशीच माहिती समोर आली आहे. कर्नाटक पोलिसांनी रविवारी रात्री आऊटर बेंगळुरू येथील एका फार्महाऊसमध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर धाड टाकली.
या रेव्ह पार्टीचं आयोजन कोणी केलं होतं आणि त्यात कोण कोण सामील आहेत, याचा शोध पोलीस घेत आहेत. या रेव्ह पार्टीत एक कॉमेडियन आणि अभिनेत्रीही हजर असल्याची माहिती समोर आली आहे. ही साऊथमधील प्रसिद्ध अभिनेत्री असून तिने आजवर 250 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. कोण आहे ही अभिनेत्री जाणून घ्या.


साऊथ सिनेसृष्टीतील कॉमेडियन आणि अभिनेत्री हेमाही बेंगरूळमधील रेव्ह पार्टीत सहभागी झाल्याचं समोर आलं आहे. हेमाने आजवर तामिळ, तेलगू आणि कन्नड इंडस्ट्रीमध्ये 250 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. हेमा रेव्ह पार्टीत असल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होताच अभिनेत्रीची यावर प्रतिक्रिया समोर आली आहे.
या रेव्ह पार्टीत मी सहभागा नव्हते असं हेमाने स्पष्ट केलं आहे. या प्रकरणावर स्पष्टीकरण देत हेमा म्हणाली, ''मी हैदराबादमध्ये आहे. माझ्या फार्महाऊसमध्ये आहे. माझा बेंगळुरू रेव्ह पार्टीशी संबंध नाही. मला विनाकारण यात ओढलं जात आहे. माझ्याबद्दल खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. त्यात काही तथ्य नाही.'' असं तिने म्हटलं आहे.

मात्र, पोलिसांनी तिच्या रक्ताचे नमुने घेतले असून ती या पार्टीत होती की नव्हती हे लवकरच समोर येईल. अनेक बातम्यांमध्ये हेमाचे नाव बेंगळुरू रेव्ह पार्टीत सहभागी झालेल्यांच्या यादीतही आलं आहे. त्यामुळेच तिच्या चाहत्यांचं आता पोलिसांच्या रिपोर्टकडे लक्ष आहे.
रिपोर्ट्सनुसार, रेव्ह पार्टीमध्ये आंध्र प्रदेश आणि हैदराबादमधील अनेक मॉडेल, डीजे आणि कलाकार सहभागी झाले असल्याची माहिती आहे. हेमाविषयी सांगायचं तर, 57 वर्षांची हेमा गेली 3 दशकं चित्रपटसृष्टीत काम करत आहे. ती मुख्यतः कॉमेडी आणि सहाय्यक भूमिकांसाठी ओळखली जाते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.