Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शाहरुख खानची प्रकुर्ती बिघडली, अहमदाबाद रुग्णालयात दाखल

शाहरुख खानची प्रकुर्ती बिघडली, अहमदाबाद रुग्णालयात दाखल 


बॉलिवूडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खानला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उन्हाचा त्रास होऊ लागल्यामुळे शाहरुख खानला अहमदाबाद येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या डॉक्टरांकडून त्याच्यावर उपचार सुरू आहे. शाहरुखला रुग्णालयामध्ये दाखल केल्यामुळे त्याचे चाहते चिंतेत आले आहेत. त्याला लवकर बरं वाटावं यासाठी ते प्रार्थना करत आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख खानला अहमदाबादच्या केडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उष्माघाताचा त्रास होऊ लागल्यामुळे शाहरुखला रुग्णालयात दाखल करण्यात आले. आयपीएल टीमला सपोर्ट करण्यासाठी तो अहमदाबादला आला होता. आयपीएलचा पहिला प्ले-ऑफ पाहण्यासाठी किंग खानला त्रास होऊ लागला. त्यामुळे त्याला लगेच अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.


कडक उन्हामुळे शाहरुख खानची तब्येत बिघडली असल्याचे सांगितले जात आहे. अहमदाबादमध्ये त्याला उष्माघातामुळे डिहायड्रेट झाले. किंग खानला बुधवारी दुपारी दोन वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या केडी रुग्णालयाबाहेर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शाहरुखची प्रकृती बिघडल्यामुळे त्याचे चाहते चिंतेत आले आहेत. त्यांनी रुग्णालयाबाहेर गर्दी करू नये यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये केकेआर संघाला सपोर्ट करण्यासाठी शाहरुख खान मंगळवारी गुजरातला पोहोचला होता. सोमवारी त्याने मुंबईत मतदान केले आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तो टीमला चिअर करण्यासाठी अहमदाबादला पोहचला. पण उन्हामुळे त्याला खूप त्रास होऊ लागला. त्यामुळे त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.