Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

डंपरच्या धडकेत सांगली जिल्ह्यातील पत्नीचा मृत्यूः पती गंभीर जखमी पुणे-सातारा महामार्गावर अपघात

डंपरच्या धडकेत सांगली जिल्ह्यातील पत्नीचा मृत्यूः पती गंभीर जखमी पुणे-सातारा महामार्गावर अपघात


पुणे सातारा महामार्गावर सुट्टीसाठी आपल्या मूळ गावी जाणाऱ्या पती-पत्नीच्या दुचाकी ला भरधाव आलेल्या डंपरने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर पती गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर घटनास्थळावरून डंपर चालकांने पलायन केले आहे. पुणे सातारा महामार्गावर शिवरे तालुका भोर गावच्या हद्दीत गुरुवारी (दि ९) रोजी सकाळी नऊच्या सुमारास हा अपघात झाला.

सोनाली महेश साठे (वय 23) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर तिचा पती महेश बाळू साठे (वय 28, रा. दोघेही गजानन नगर फुरसुंगी ता. हवेली जि. पुणे मुळगांव बांबवडे, ता. पलूस जि. सांगली) हा गंभीर जखमी झाला आहे याप्रकरणी महेश साठे यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी धडक देवुन प्रसार झालेल्या डंपर चालकांवर गुन्हा दाखल केला आहे.


महेश व सोनाली हे दोघेही गुरुवारी सकाळी त्यांच्या मूळगावी जात असताना त्यांच्या दुचाकीला (एमएच 70 डीयू 7559) पुणे-सातारा महामार्गावर शिवरे गावच्या हर्दीमध्ये त्यांना पाठीमागून भरधाव आलेल्या डंपरने (एम.एच 12 व्हीटी 8689) जोरदार धडक दिली. यामध्ये रस्त्यावर पडलेल्या सोनालीच्या अंगावरून डंपरचे चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर पती महेश गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी राजगड पोलीस पुढील तपास करीत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.