Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ट्रेन सुटली म्हणून नवरा परत घरी आला :, दरवाजा उघडताच.....

ट्रेन सुटली म्हणून नवरा परत घरी आला :, दरवाजा उघडताच.....


लखनऊ : तुम्ही एखाद्या लांबच्या प्रवासाला जात असाल आणि अचानक ट्रेन सुटली तर एक तर तुम्ही दुसऱ्या ट्रेनसाठी बराच वेळ प्रतीक्षा करता किंवा घरी जाता. अशीच एक व्यक्ती जी कामानिमित्त ट्रेननं प्रवास करणार होती ती व्यक्ती स्टेशनवर पोहोचण्याआधी तिची ट्रेन सुटली म्हणून ती व्यक्ती पुन्हा घरी परतली. पण घराचा दरवाजा उघडताच त्या व्यक्तीला मोठा धक्का बसला.
उत्तर प्रदेशच्या महाराजगंज जिल्ह्यातील बैथवालिया इथली ही घटना. मिळालेल्या माहितीनुसार, गावातील एक व्यक्ती पैसे कमावण्यासाठी बाहेर जात असताना त्याची ट्रेन चुकली. त्याने पुन्हा घरी जायचं ठरवलं. पण आपण घरी येत आहोत याबाबत त्यानं आपल्या पत्नीला कळवलं नव्हतं. जसा तो घरी पोहोचला आणि त्याने घराचा दरवाजा उघडला तेव्हा त्याला मोठा धक्का बसला.


व्यक्तीच्या घरात काय होतं?

दरवाजा उघडताच त्याला त्याची पत्नी परपुरुषासोबत दिसली. ती तिच्या वृद्ध प्रियकरासह आक्षेपार्ह अवस्थेत होती. विठ्ठल साहनी त्याच गावात राहत होता. व्यक्तीच्या पत्नीचे याच्याशी अनैतिक संबंध होते. पती बाहेर कमावत असल्याची माहिती मिळताच विठ्ठल तिला भेटण्यासाठी प्रेयसीच्या घरी पोहोचला.

प्रियकर आणि पत्नीला रॉडने मारहाण

महाराजगंज. महाराजगंज जिल्ह्यातील निचलौल पोलीस स्टेशन हद्दीतील बैथवालिया येथे रविवारी रात्री एका व्यक्तीने प्रेमप्रकरणादरम्यान पत्नीच्या प्रियकराला बेदम मारहाण केली. पत्नी रक्ताने माखलेली होती. पोलिसांनी जखमी महिलेला रुग्णालयात दाखल केले आहे. माहिती मिळताच पोलीस अधीक्षक सोमेंद्र मीणा यांनीही सोमवारी सकाळी घटनास्थळ गाठून पोलिसांना कारवाईसाठी आवश्यक निर्देश दिले.

पत्नी आणि तिच्या प्रियकराला आक्षेपार्ह अवस्थेत पाहून नवरा संतापला. त्याने रागाच्या भरात त्याने दोघांवर रॉडने वार केले. यात प्रियकराचा जागीच मृत्यू झाला आहे, विठ्ठल साहनी असं त्याचं नाव. तर तर पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. रविवारी रात्री उशिरा घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमी महिलेला रुग्णालयात दाखल केलं. दरम्यान आरोपी पती फरार आहे. त्याला पकडण्यासाठी पोलिसांचं पथक तैनात करण्यात आलं आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.