Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भारताच्या माजी राष्ट्रपतींच्या अंगणांत 150 वर्षे जुनं तूळशीचं रोप :, आज पण जसंच्या.....

भारताच्या माजी राष्ट्रपतींच्या अंगणांत 150 वर्षे जुनं तूळशीचं रोप :, आज पण जसंच्या.....


सीवान : आज आम्ही तुम्हाला तब्बल 150 वर्षांपेक्षा जुन्या असलेल्या एका झाडाबाबत सांगणार आहोत. या झाडाबद्दल तुम्हाला काही गोष्टी माहिती झाल्यावर तुम्हालाही नवल वाटले. तुम्हीही विचार केला नसेल की एकादे झाड इतके कसे जुने असू शकते. आम्ही ज्या झाडाबद्दल बोलत आहोत, ते तुळशीचे झाड आहे. हे तुळशीचे रोप तब्बल 150 वर्षांपेक्षा जास्त जुने आहे.
देशातील पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या वडिलोपार्जित घराच्या अंगणात हे रोप आहे. राजेंद्र बाबू यांचे वडील या तुळशीची पूजा करायचे. आज ते हयात नाहीत. मात्र, तरीसुद्धा आजही लोकं या तुळशीच्या दर्शनासाठी येतात.
डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या वडिलोपार्जित घराच्या अंगणात 150 वर्षांपेक्षा जुने तुळशीचे रोप आहे. या तुळशीच्या रोपाची लागवड राजेंद्रबाबूंचे वडील मुन्शी महादेव सहाय यांनी स्वतःच्या हाताने केली. त्यांच्या मृत्यूनंतर राजेंद्र बाबू जेव्हाही जीरादेईमध्ये जायचे किंवा राष्ट्रपती झाल्यानंतरही जेव्हा त्यांनी आपल्या गावाला भेट दिली तेव्हा त्यांनी या तुळशीच्या रोपाची पूजा केली. हे तुळशीचे रोप अजूनही त्याच अंगणात आहे. ही तुळशी आजही म्हणजे तब्बल 150 वर्षांपेक्षा जास्त वेळ राहण्याचे मुख्य कारण म्हणजे ती दरवर्षी सुकते आणि त्याच ठिकाणी पुन्हा हिरवी होते, असे म्हणतात.

1874 मध्ये या तुळशीची लागवड - 
अभिषेक कुमार सांगतात की, आमचे आजोबा आणि वडील सांगतात की मुन्शी महादेव सहाय यांनी हे तुळशीचे रोप 1874 च्या सुमारास लावले होते. इतका वेळ प्लांट तिथेच राहिल्यानंतर येथे नियमितपणे साफसफाई केली जात आहे. भारतीय पुरातत्व विभागाने त्याच्या देखभालीसाठी केअरटेकरची नियुक्ती केली आहे. केअरटेकर रोज साफसफाई करून तुळशीला पाणी देतात. ही तुळशी वाळल्यावर पुन्हा त्याच ठिकाणी आपोआप उगवते. यामुळेच सुमारे 150 वर्षांहून अधिक काळ झाला, ही तुळशी आजही तशीच आहे. आठवण म्हणून तिची जपणूक केली जात आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.