Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक मोठा भूकंप, मंत्रिमंडळाबाबत मोठी बातमी

महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक मोठा भूकंप, मंत्रिमंडळाबाबत मोठी बातमी 


मुंबई : लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला राज्यात मोठा फटका बसला आहे. भाजपला केवळ 9 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. तर काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. यानंतर राज्यातील राजकारणातही हालचालींना वेग आला आहे. आता मंत्रीमंडळ विस्तार करून डॅमेज कंट्रोल केलं जाणार आहे. राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता आहे.
केंद्रातील सत्तास्थापनेनंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता असल्याची माहिती समोर येत आहे. लोकसभा निवडणूक निकालानंतर महायुतीच्या गतिमान हालचाली पाहायला मिळत आहेत. 12 जूननंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अवघ्या 3 महिन्यांच्या कालावधीसाठी मंत्रिमंडळ अनुशेष भरून काढणार जाणार आहे. यासोबतच काही महामंडळ नियुक्तीबाबतही निर्णय होण्याची शक्यता आहे.

मुंबईसह काही जे भाजपचे गड म्हणून ओळखले जाणारे मतदारसंघ किंवा दिग्गज नेते मोठ्या मताधिक्याने पराभूत झालेत. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्रात पुन्हा भूकंप होण्याचे संकेत असताना ही महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

बैठकीत फडणवीसच गैरहजर
दुसरीकडे आज सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वाची बैठक सुरू आहे. सह्याद्री अतिथीगृहात कॅबिनेट मीटिंग सुरू आहे. दुपारी 4 वाजता राज्य मंत्रिमंडळ बैठक आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र गैरहजर राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. गिरिश महाजन यासह भाजपचे,शिवसेनेचे प्रमुख मंत्री, सहभागी होणार आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आजच्या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला लोकसभा निवडणुकीत मिळालेलं यश पाहता अजित पवारांच्या आमदारांमध्ये धाकधुक वाढली आहे. अजित पवार यांच्या आमदारांनी महायुतीचं काम करा, असं कार्यकर्त्यांना सांगूनदेखील महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आल्याने आमदारांमध्ये संभ्रमाची भावना निर्माण झाली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.