लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. नागरिकांचा विरोध डावलून या प्रकल्पाचा आराखडा दोन-तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे शासनस्तरावर गतीने प्रयत्न सुरू आहेत.
यासंदर्भात अधिसूचना निघाली असून, भूसंपादन अधिकाऱयांच्या नेमणुकादेखील झाल्या आहेत. सांगली जिह्यातील 1 हजार 135 गटांतून हा महामार्ग जाणार असून, पाच हजार शेतकऱयांना याचा फटका बसणार आहे.
नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्ग बारा जिह्यांतून जाणार असून, सुमारे 802 कि.मी. लांबीचा हा महामार्ग आहे. या महामार्गाद्वारे 12 जिह्यांतील 19 देवस्थाने जोडली जाणार आहेत. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर एमएसआरडीसी शक्तिपीठ या प्रवेश नियंत्रित शीघ्रसंचार महामार्गाची उभारणी करीत आहे. वर्धा जिह्यातील पवनार येथून हा महामार्ग सुरू होणार असून, गोव्याच्या सीमेवर सिंधुदुर्ग जिह्यातील पत्रादेवी येथे महामार्ग समाप्त होणार आहे. शक्तिपीठ महामार्गामुळे 22 तासांचा प्रवास हा 11 तासांत होणार आहे. सुमारे 802 कि.मी. लांबीच्या या महामार्गासाठी भूसंपादनासह 86 हजार 300 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.सांगली जिह्यातील आटपाडी, तासगाव, मिरज, कवठेमहांकाळ तालुक्यातील पाच हजार शेतकऱयांच्या जमिनी यात जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने 7 मार्चला अधिसूचना काढली आहे. त्यात बाधित शेतकऱयांच्या हरकती व आक्षेपदेखील नोंदविण्यात आले आहेत. प्रस्तावित महामार्गाबाबत सांगलीतून 611 हरकती शासनापुढे मांडण्यात आल्या आहेत. मात्र, लोकसभेची आचारसंहिता लागू झाल्याने या महामार्गाबाबत पुढील कोणताही धोरणात्मक निर्णय घेतला नाही. मात्र, आता या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होणार आहे. येत्या दोन-तीन महिन्यांत आराखडा पूर्ण करण्याचे टार्गेट असणार आहे. त्यानंतर आराखडय़ाला राज्य शासनाची मंजुरी घेतली जाईल.
जमीन अधिग्रहण अधिसूचना जारी केली आहे. त्यासाठी मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ व आटपाडी या तालुक्यांतील प्रांताधिकाऱयांची नेमणूक केली गेली आहे. मात्र, शेतकऱयांनी जमिनी अधिग्रहण करण्यास विरोध केला आहे. यासंदर्भात शेतकऱयांचे मेळावेदेखील होऊ
शक्तिपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीची आज बैठक
शक्तिपीठ महामार्ग संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाची अधिसूचना जाहीर झाली आहे. त्यामुळे पुढील दिशा ठरविण्यासाठी गुरुवार (दि. 13)सकाळी 11.30 वाजता कष्टकऱयांची दौलत, पंचमुखी मारुती रोड, खणभाग, सांगली येथे बाधित शेतकऱयांची बैठक आयोजित केली आहे, अशी माहिती शक्तिपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीचे उमेश देशमुख, सतीश साखळकर यांनी दिली.लागले आहेत. त्यामुळे शासन जमिनी अधिग्रहण करण्यासाठी मोबदला किती देणार? यावर शेतकऱयांच्या आंदोलनाची दिशा ठरणार आहे.
पिकाऊ जमिनी होणार बाधित
शक्तिपीठ महामार्गामुळे जिह्याच्या आर्थिक, औद्योगिक विकासाला चालना मिळणार असली तरी आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ व मिरज तालुक्यांतील अनेक पिकाऊ जमिनी बाधित होणार आहेत. यामध्ये द्राक्ष, डाळिंब, ऊस व इतर फळबागांचे क्षेत्र मोठय़ा प्रमाणात आहे. अल्पभूधारक शेतकऱयांना या महामार्गाचा मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे या विरोधात आंदोलनाचा एल्गार शेतकऱयांनी दिला आहे.
बारा जिह्यांतील धार्मिक स्थळे जोडणार
धार्मिक स्थळे जोडण्यासाठी शक्तिपीठ महामार्ग केला जात आहे. या महामार्गामुळे वर्धा जिह्यातील केळझरचा गणपती, कळंब येथील गणपती मंदिर, सेवाग्राम, वाशीम येथील पोहरादेवी, नांदेड येथील माहुरगड, सचखंड गुरुद्वारा, हिंगोली येथील औंढय़ा नागनाथ, बीड येथील परळी वैजनाथ, अंबेजोगाई, धाराशीव येथील तुळजापूर, सोलापूर येथील पंढरपुरातील विठ्ठल मंदिर, अक्कलकोट, सांगली औदुंबरचे दत्त मंदिर, कोल्हापूर येथील नरसोबावाडी, ज्योतिबा मंदिर, अंबाबाई मंदिर, संत बाळूमामा मंदिर, सिंधुदुर्ग कुणकेश्वर मंदिर आणि पत्रादेवी.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.