Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

' क्लास वन ' अधिकारी बहीण - भावाचा ' कार ' नामा :, अपघात भासवून हत्या, धक्कादायक खुलासे समोर

' क्लास वन ' अधिकारी बहीण - भावाचा ' कार ' नामा :, अपघात भासवून हत्या, धक्कादायक खुलासे समोर 


नागपूर : नागपूरमध्ये हिट अँड रन प्रकरण हे घातपाताचं असल्याचा उलगडा झाल्यानंतर यात अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. पुरुषोत्तम पुट्टेवार यांची ३०० कोटी रुपयांच्या संपत्तीसाठी सूनेनेच हत्या घडवून आणल्याचं पोलीस तपासात उघड झालंय.

क्लास वन अधिकारी असणाऱ्या अर्चना पुट्टेवार हिने ड्रायव्हरला हाताशी धरून आपल्याच सासऱ्याच्या खूनाची १ कोटी रुपयांची सुपारी दिली. यामध्ये सूनेच्या अधिकारी भावाचाही हात असल्याची माहिती आता समोर येत आहे. या प्रकरणी सुनेसह तिचा भाऊ आणि इतर चौघांना अटक करण्यात आली आहे. पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या खून प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या हत्या प्रकरणी गडचिरोलीत नगरविकास सहायक संचालक असलेल्या अर्चना पुट्टेवार हिच्यासह चालक सार्थक बागडे, नीरज निमजे, सचिन धार्मिक यांना अटक करण्यात आली होती. यात कुणाला सुपारी दिली गेली, कोणाचा हात होता याचा शोध पोलिसांनी घेतला.
पुरुषोत्तम पुट्टेवार हत्या प्रकरणात सून अर्चना पुट्टेवार हिच्या भावाचेही नाव समोर आले आहे. एनएसएमई संचालक असलेल्या प्रशांत पार्लेवार आणि आर्किटेक्ट असणाऱ्या पायल नागेश्वर यांची नावे समोर आली आहेत. पायल ही अर्चनाची सहायक होती. तिच्या माध्यमातूनच हा पैशांचा व्यवहार व्हायचा. बहिणीला तिच्या सासऱ्याचा खून करण्यासाठी प्रशांतने मदत केल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉक्टर रविंद्र कुमार सिंगल यांनी दिली.

नागपूरमध्ये २२ मे रोजी ८२ वर्षांच्या पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा कारने चिरडून मृत्यू झाला होता. हिट अँड रन अपघात असल्याचं प्रथमदर्शनी आढळलं होतं. पण पोलीस तपासात हा खून असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. अपघात असल्याचं भासवून खून करण्याचा कट सुनेनेच रचला होता.
अर्चना ही पुरुषोत्तम पुट्टेवार यांची सून असून पुट्टेवार यांची मुलगी योगिता हिचं लग्न अर्चानाचा भाऊ प्रवीण याच्याशी झालं होतं. मात्र प्रवीणचा २००७ मध्ये मृत्यू झाला. यानंतर योगितासोबत तिचे वडील पुरुषोत्तम हे रहायचे. योगिताला पुरुषोत्तम यांच्या संपत्तीतील मिळणारा आपल्याला मिळवता येईल यासाठी पुरुषोत्तम यांच्या खुनाचा कट सून अर्चना आणि तिचा दुसरा भाऊ प्रशांत यांनी रचला होता.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.