Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

चष्मा नको वाटतं? रोज खावा 5 पदार्थ :, नजर होईल तेज आणि डोळे होतील सुंदर

चष्मा नको वाटतं? रोज खावा 5 पदार्थ :, नजर होईल तेज आणि डोळे होतील सुंदर 


डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी डाएटरी न्युट्रिएंट्सबाबत माहिती असणं गरजेचं असतं. व्हिटामीन ए व्यतिरिक्त अनेक पोषक तत्वांसाठी हे आवश्यक असते. चश्म्या नंतर काढून टाकण्यासाठी तुम्ही ओमेगा-३ फूड्सचे सेवन करू शकता.

डोळ्यांची क्षमता कमी होण्याची अनेक कारणं असू शकतात. खाण्यात पोषक तत्वांची कमतरता असल्यास नजर कमकुवत होऊ लागते. याच्या उपचारांसाठी डोळ्यांना आवश्यक असलेल्या न्युट्रिएंट्सचा आहारात समावेश करा. ज्यामुळे हळूहळू चश्माची गरज कमी होऊ लागते आणि दृष्टी सुधारण्यास मदत होते. 

व्हिटामीन ए डोळ्यांच्या आरोग्यासाठी फार महत्वाचे असते. यात अनेक पोषक तत्व असतात. ज्यातील ओमेगा ३ डोळ्यांसाठी उत्तम ठरते. यामुळे मोतिबिंदूचा धोका कमी होतो. नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ हेल्थच्या रिपोर्टनुसार फ्लेक्स सिड्स सोयाबीन ऑईल, कॅनोला ऑईल यात ओमेगा ३ फॅट्स असतात ज्यामुळे दृष्टी चांगली राहते आणि डोळ्यांचे आरोग्य सुधारते. तेलाव्यतिरिक्त नट्स आणइ सिड्समध्ये असे काही न्युट्रिएंट्स असतात. आळशीच्या बीया, चिया सिड्स आणि अक्रोडमध्ये याचे प्रमाण चांगले असते.
फोर्टिफाईड फूड्समध्ये व्हिटामीन्सचे प्रमाण उत्तम ठरते. यात वेगवेगळे पदार्थ घातले जाता. अंडी, योगर्ट, मिल्क यात फोर्टिफाईड करण्यासाठी ओमेगा ३ घातले जाते. जर तुम्ही जेवणात ओमेगा ३ घेऊ शकत नसाल तर या सम्लीमेंट्सची मदत घ्या. फिश ऑईल, क्रिल ऑईल, कोड लिव्हर ऑईल उत्तम सोर्स आहेत. शाकाहारी लोक एल्गीपासून बनलेले एल्गल ऑईल सप्लीमेंट्स घेऊ शकतात.

ओमेगा ३ चे फायदे
ओमेगा ३ मुळे हृदय, मेंदू, डोळे, स्किन हेल्दी राहण्यास मदत होते. कॅन्सरपासून बचावासाठी हे उत्तम ठरते. काही संशोधनांमध्ये असे दिसून आले की कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी ओमेगा ३ चे सेवन करू शकता. युएसडीए च्या रिपोर्नुसार एका दिवसाला ५ ग्रामपेक्षा जास्त ईपीए आणइ डीएचए ओमेगा ३ घेऊ नये. याशिवाय सप्लिमेंट्स इतर औषधांबरोबर रिएक्ट करू शकतात.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.