Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कानशिलात लगावलेल्या महिला जवांनला कामाची ऑफर :,तर ' पंगाकिव्न ' वर बॉलीवूडची नाराजी

कानशिलात लगावलेल्या महिला जवांनला कामाची ऑफर :,तर ' पंगाकिव्न '  वर बॉलीवूडची नाराजी 


खासदार म्हणून निवडून येताच अभिनेत्री कंगना रणौत ही एका वेगळ्या गोष्टीमुळे पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली. चंदीगढ विमानतळावर एका सीआयएसएफच्या महिला जवानाने तिच्या कानशिलात लगावली आणि सोशल मीडियाचं वातावरणच बदललं.
त्यानंतर त्या महिला जवानाच्या विरोधात कायदेशीर कारवाई देखील करण्यात आल्याचं CISF कडून सांगण्यात आलं. पण यासगळ्यात बॉलीवूडमधून कोणत्याही प्रकारचा पाठिंबा मिळत नसल्याचं कंगनाने म्हटलं. तसेच दुसरीकडे त्या महिलेला थेट बॉलीवूडमधून ऑफर आल्याच्या सध्या चर्चा आहेत. 

संगीतकार विशाल ददलानीच्या पोस्टमुळे या सर्व चर्चांना उधाण आलं. विशालने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट केली, त्यामध्ये त्याने या घटनेवर भाष्य केलं. दरम्यान त्याने कंगनासोबत घडलेल्या प्रकाराचं समर्थन नाही केलं, पण त्या महिलेवर झालेल्या कारवाईचा मात्र निषेध केला. त्यामुळे त्या महिलेवर जरी कारवाई झाली तरी आम्ही तिला काम देऊ असं आश्वासनच विशाललने दिलं आहे. 

विशालची पोस्ट नेमकी काय?

विशालने त्याच्या सोशल मीडियावर तो व्हिडिओ पोस्ट केला आहे. दरम्यान त्याने त्यावर म्हटलं की, मी कुठल्याही प्रकराच्या हिंसेचं समर्थन करत नाही, पण त्या महिलेचा राग मी नक्कीच समजू शकतो. जर तिच्या विरोधात सीआयएसएफकडून कोणती कारवाई करण्यात आली तर जर तिची इच्छा असेल तर तिला काम देण्याचं आश्वासन मी देतो. दरम्यान विशालच्या या पोस्टमुळे त्या महिलेला थेट आता बॉलीवूडमधून ऑफर आल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. 

कंगनाला बॉलीवूडकरांचा पाठिंबा नाही?
दरम्यान हा प्रकार झाल्यानंतर एकाही बॉलीवूड कलाकाराने कंगनाच्या समर्थनार्थ पोस्ट केली नाही. त्याचा रोषही अभिनेत्रीने व्यक्त केला. त्यामुळे कंगनासोबत घडलेल्या या प्रकारावर बॉलीवूडकरांनी मौन बाळगणं पसंत केल्याचं म्हटलं जात आहे. तसेच कोणीच पाठिंबा दिला नाही, यासाठी कंगनाने देखील एक संतप्त पोस्ट केली आहे. त्यामुळे कंगनाला समर्थन न देता त्या महिलेसाठी उभं राहणारं बॉलीवूड कंगनावर नाराज असल्याचंही आता म्हटलं जात आहे. बॉलीवूडवर राग व्यक्त करत कंगनाने म्हटलं की, ऑल आईज ऑन रफाह गँग, हे तुमच्यासोबत किंवा तुमच्या मुलांसोबतही घडू शकतं. जेव्हा तुम्ही दुसऱ्यावर होणारा दहशतावादी हल्ला साजरा करता तेव्हा तो तुमच्यावरही कधीतरी होईल याची देखील तयारी ठेवा.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.