Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अपघात प्रकरणात सहाय्य्क फौजदार निलंबत, मद्यपान केल्याचं वैध्यकीय तपासणीत उघड

अपघात प्रकरणात सहाय्य्क फौजदार निलंबत, मद्यपान केल्याचं वैध्यकीय तपासणीत उघड 


पिंपरी : अपघात प्रकरणात सहायक फौजदार निलंबित, मद्यपान केल्याचे वैद्यकीय तपासणीत उघड पोलिसांच्या व्हॅनने महिलेसह एका दुचाकीला धडक देऊन गंभीर जखमी केल्याची घटना मंगळवारी (दि.4) दुपारी अडीचच्या सुमारास बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथील पोलीस चौकीसमोर घडली होती. याप्रकरणी सहायक फौजदारावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. वैद्यकीय अहवालात संबंधित पोलिसाने मद्यापान केल्याचे निष्पन्न झाल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.


नागेश भालेराव  असे निलंबित सहायक फौजदाराचे नाव आहे. भालेराव हा हिंजवडी पोलीस ठाण्यात  कार्य़रत आहे. या अपघातात शकुंतला पंडित शेळके (रा. महाळुंगे) या जखमी झाल्या असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मंगळवारी मावळ लोकसभा मतदारसंघाची  मतमोजणी बालेवाडी येथील क्रीडा संकुल येथे पार पडली. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर पोलीसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बंदोबस्तासाठी जागा दिलेली नसतानाही भालेराव हा बालेवाडी येथील पोलीस चौकीसमोर गेला.

भालेराव व्हॅनमध्ये बसला असाताना गाडीचे इंजिन सुरु होते. त्याचा पाय अॅक्सिलेटरवर पडला. त्यामुळे वाहनाने समोरुन पायी जाणाऱ्या शकुंतला यांच्यासह उभ्या दुचाकींना धडक दिली. यामध्ये शकुंतला यांना गंभीर दुखापत झाली. तसेच, एका तरुणाच्या दुचाकीचे मोठे नुकसान झाले. घटनास्थळी बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना भालेराव याने मद्यपान केल्याचा संशय आला. त्यामुळे भालेराव याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यात भालेराव याने मद्यपान केल्याचे निष्पन्न झाले. यानंतर त्याला तडकाफडकी निलंबित करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात  यांनी सांगितले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.