Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

*राज्यातील एआरटीओ, सहायक निरीक्षकांच्या पदोन्नतीने बदल्या*सांगलीचे सगरे यांची अहमदनगरला, कोल्हापूरचे दीपक पाटील यांची जळगाव येथे बदलीसाताऱ्याच्या प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी दशरथ वाघुले*

*राज्यातील एआरटीओ, सहायक निरीक्षकांच्या पदोन्नतीने बदल्या*सांगलीचे सगरे यांची अहमदनगरला, कोल्हापूरचे दीपक पाटील यांची जळगाव येथे बदलीसाताऱ्याच्या प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी दशरथ वाघुले*


मुंबई :  राज्यातील परिवहन विभागातील (आरटीओ) सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्यासह सहायक निरीक्षकांच्या पदोन्नतीने बदल्या करण्यात आल्या आहेत. कराडचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तसेच सांगलीचे प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांची पदोन्नतीने अहमदनगर येथे प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) म्हणून बदली करण्यात आली आहे. कोल्हापूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांची जळगाव येथे बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी गडचिरोली येथील विजय चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  सांगलीचे तत्कालीन आणि सध्याचे वसई येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले यांची सातारा येथे प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 


सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची पदोन्नतीने उपप्रादेशिक परिवहन अधिकारीपदी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी कंसात नियुक्तीचे ठिकाण राहुल जाधव (पुणे ते पिंपरी-चिंचवड), विजय पाटील (पुणे ते सोलापूर), स्वप्नील भोसले (पुणे ते पुणे), आशुतोष बारकूल (कोकण २ ते कल्याण), अनंत भोसले (कोकण २ ते परिवहन आयुक्त कार्यालय), विजय काळे (कोकण १ ते सिंधुदुर्ग), प्रशांत देशमुख (अमरावती ते यवतमाळ), रोहित काटकर (कोकण २ ते ठाणे), श्रीमती समरीन सय्यद (कोकण २ ते मुंबई मध्य), स्नेहा मेंढे (नागपूर ते वर्धा), अनंता जोशी (नाशिक ते श्रीरामपूर). राज्य शासनाचे अवर सचिव भरत लांघी यांच्या सहीने हे आदेश काढण्यात आले आहेत. 
सहायक निरीक्षक यांची पदोन्नतीने निरीक्षकपदी नियुक्ती झालेल्या अधिकाऱ्यांची नावे कंसात नियुक्तीचे ठिकाण सूरज पवार (पिंपरी चिंचवड), नितीन पारखे (पुणे), गंगाधर मेकालवार (बारामती), विश्वंभर कोकाटे (सोलापूर), निर्मला वसावे (जळगाव), विजय कांबळे (चंद्रपूर), किरण डोंगरे (नागपूर ग्रामीण), विशाल गायकवाड (मुंबई पश्चिम), महेश माने (पनवेल), शीतल काटे (सांगली), अनुपमा पुजारी (सातारा), भूषण अहिरे (नाशिक), मंगेश बर्डे (नागपूर ग्रामीण), घनश्याम चव्हाण (नाशिक), मंगेश राठोड (नागपूर शहर), दीपक साळुंके (धुळे), शीतल पाटील (मुंबई पूर्व), दिनेश पाटील (अहमदनगर), श्वेता कुलकर्णी (पुणे), मोनिका साळुंखे (मुंबई पूर्व), प्रदीप भाट (मुंबई मध्य), सुप्रिया गावडे (कल्याण), गजानन हतेडीकर (मुंबई पश्चिम), तुषार चौधरी (नागपूर), मंगेश गुरव (बोरिवली), सुयोग पाटील (मुंबई मध्य), चेतन अडकटलवार (पेण), हेमंत गावडे (बुलढाणा), राजश्री पाटील (रत्नागिरी), अजय थोरात (वसई), हेमंत जयकर (नांदेड), संदीप मोरे (लातूर), प्रज्ञा अभंग (वाशी नवी मुंबई), कल्याणी मंडलिक (छत्रपती संभाजीनगर), भाग्यश्री पाटील (अकोला), पूनम पोळ (धाराशिव), संजिवनी चोपडे (जालना), विशाल नाबदे (अमरावती). परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्या सहीने हे आदेश काढण्यात आले आहेत.
याशिवाय गजानन नेरपगार, अनिल वळीव, संजय मेत्रेवार, प्रदीप शिंदे, किरण बिडकर, अनिल पाटील, रविंद्र भुयार, संदेश चव्हाण, संजीव भोर, विजय कठोळे, अशोक पवार, उर्मिला पवार, विनय अहिरे, जयकुमार पाटील, हेमांगिनी पाटील आदी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची पदोन्नतीने पदस्थापना करण्यात आली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.