Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Big Breaking! लाडकी बहीण योजनेसाठी सरकारच आणखी एक पाऊल, रक्षाबंधनांला 3 हजार रुपये खात्यात!

Big Breaking! लाडकी बहीण योजनेसाठी सरकारच आणखी एक पाऊल, रक्षाबंधनांला 3 हजार रुपये खात्यात!


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना काटेकोरपणे राबवण्यासाठी राज्य सरकारकडून पुन्हा दोन समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. लाभार्थी नोंदणी पोर्टल समिती आणि लाभदायी प्रणाली समिती स्थापन करण्यात आल्या आहेत. लाभार्थी नोंदणी पोर्टल समिती उर्जा विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्य समिती गठीत करण्यात आले आहे. 
तर लाभ इदायगी प्रणाली समिती वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती गठित केली आहे. ही योजना राबवण्यासाठी नोंदणी आणि लाभ मिळण्यासाठी दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करून जबाबदारी देण्यात आली आहे. या योजनेची अंमलबजावणी लवकरात लवकर होण्यासाठी आणि त्यातील त्रुटी कमी करण्यासाठी अनेक समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. 

रक्षाबंधनला 3 हजार खात्यात जमा होणार 

राज्य सरकारकडून  'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या  पहिला हप्ता कधी जमा होणार याबाबतची तारीख यापूर्वीच जाहीर करण्यात आली आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी राज्यसरकारकडून दोन महिन्यांची रक्कम एकदम जमा करण्यात येणार आहे. लाडकी बहिण योजनेअंतर्गत महिलांना दरमाहा दीड हजार रुपये मिळणार आहेत. योजनेची घोषणा झाल्यापासूनच अर्ज करण्यासाठी महिलांची झुंबड उडाल्याचं पाहायला मिळाली होती. सुरुवातील अर्ज करताना महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता, मात्र आता अनेक महिलांची अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्रतेचे निकष काय? 
महाराष्ट्र रहिवासी 

विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला

लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.2.50 लाखापेक्षा जास्त नसावे

60 वर्षे पेक्षा जास्त वय असेल तर अपात्र असाल

अपात्र कोण असेल?

2.50 लाख पेक्षा जास्त उत्पन्न असणारे

घरात कोणी Tax भरत असेल तर

कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतन घेत असेल तर

कुटुंबात 5 एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर

कुटुंबातील सदस्यांकडे 4 चाकी वाहन असेल तर (ट्रॅक्टर सोडून)
कोणती कागदपत्रं लागणार?
आधारकार्ड

रेशनकार्ड

उत्पन्नाचा दाखला

रहिवासी दाखला

बँक पासबुक

अर्जदाराचा फोटो

अधिवासाचं प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र

लग्नाचे प्रमाणपत्र

योजनेचे अर्ज पोर्टल/मोबाइल अॅपवर/सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरलं जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे. ज्यांना अर्ज करता येत नाही त्यांना अंगणवाडी केंद्रात सुविधा मिळेल.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.