Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कर्मवीर ट्रस्ट कडून गायत्री परिवारास १ लाखाची देणगी प्रदान

कर्मवीर ट्रस्ट कडून गायत्री परिवारास १ लाखाची देणगी प्रदान


सांगली :- कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयास गायत्री परिवार ट्रस्ट च्या सदस्यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. या वेळी कर्मवीर पतसंस्था आणि कर्मवीर चॅरीटेबल ट्रस्ट सांगली या दोन्ही संस्थांच्या कार्याची माहिती त्यांना देण्यात आली. गायत्री परिवाराची माहिती देताना श्री. मनोहर सारडा म्हणाले की गेली २५ वर्षे गायत्री परिवार गोशाळा चालवित आहे. त्यासाठी तसेच अन्य कार्यासाठी एक प्रशस्त इमारत बांधण्याचा त्यांचा संकल्प असल्याचे त्यांनी कर्मवीर पतसंस्था संचालक मंडळास बोलून दाखविला. 

या दोन्ही संस्था समाजासाठी चांगले योगदान देत आहेत. कर्मवीर पतसंस्थेचे आर्थिक क्षेत्रातील तर कर्मवीर चॅरीटेबल ट्रस्ट चे सामाजिक शैक्षणिक आरोग्य क्रिडा क्षेत्रासाठी भरीव योगदान असल्याची भावना गायत्री परिवार ट्रस्ट च्या सदस्यांनी बोलून दाखविली. या वेळी गायत्री परिवाराच्या कार्यास कर्मवीर चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने रु. १ लाखाच्या निधीचा चेक गायत्री परिवाराच्या सदस्याकडे सुपुर्द करण्यात आला. यावेळी कर्मवीर पतसंस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील कर्मवीर ट्रस्ट चे अध्यक्ष श्री. ओ. के. चौगुले (नाना ) यांच्या हस्ते हा निधीचा चेक प्रदान करण्यात आला. यावेळी गायत्री परिवाराच्यावतीने श्री. रावसाहेब पाटील यांचा सत्कार करणेत आला. 
यावेळी गायत्री परिवाराचे सदस्य उद्योजक श्री मनोहर सारडा, निवृत्त बँक अधिकारी श्री. आर. बी. पाटील तेली समाज प्रदेश अध्यक्ष श्री. विजय संकपाळ, श्री. प्रमोद लाड, श्री. सावकार शिराळे. कापड व्यापारी श्री. पापालाल सारडा व श्री गोपाळ सारडा हे उपस्थित होते. त्यांचा सत्कार करणेत आला. कर्मवीर पतसंस्थेच्या वतीने व्हाईस चेअरमन डॉ. अशोक आण्णा सकळे संचालक अॅड. एस. पी. मगदूम, डॉ. रमेश वसंतराव ढबू. श्री. वसंतराव धुळाप्पाण्णा नवले. डॉ. एस. बी. पाटील (मोटके) डॉ. चेतन आप्पासाहेब पाटील संचालिका श्रीमती भारती आप्पासाहेब चोपडे, तज्ञ संचालक डॉ. नरेंद्र आनंदा खाडे. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल श्रीपाल मगदुम हे उपस्थित होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.