Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पलंगावर झोपलेल्या मुलाच्या पॅन्टमध्ये घुसला कोब्रा, प्रायव्हेट पार्ट वर दंश अन...

पलंगावर झोपलेल्या मुलाच्या पॅन्टमध्ये घुसला कोब्रा, प्रायव्हेट पार्ट वर दंश अन...


सध्या पावसाळ्याच्या ऋतूत साप चावण्याच्या अनेक घटना समोर येत असतात, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असते. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशातील देवासमध्येही घडल्याचे समोर आले आहे. तेथे एका लहान मुलगा घरात पलंगावर झोपलेला असताना अचानक एक कोब्रा आला आणि त्याच्या पँटमध्ये शिरला. 
त्या सापाने त्याच्या प्रायव्हेट पार्टवर दंश केल्याने तो मुलगा कळवळला. मुलाला साप चावल्याचे समजताच घरात एकच गोंधळ उडाला. कुटुंबियांनी त्यालाला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्या मुलाला मृत घोषित केले. मुलाच्या अकस्मात मृत्यूने सर्वांनांच मोठा धक्का बसला असून घरात शोकाकुल वातावरण आहे.

ही दुर्दैवी घटना कणकुंड खाटांबा परिसरात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलाचे नाव चंदन मालवीय असून तो 15 वर्षांचा आहे. बुधवारी रात्री जेवण करून चंदन आपल्या खोलीत झोपायला गेला. पण थोड्या वेळाने त्याच्यासोबत काय घडणार आहे, याची कोणालाही कल्पनाच नव्हती. रात्री उशिरा अचानक चंदनने आरडाओरडा सुरू केला. आपल्या पँटमध्ये साप घसुल्याचे त्याने सांगितले. चंदनचा आरडाओरडा ऐकून त्याचे काक धावत त्याच्याकडे आले.

काकांनी त्याला मदत करत पँटमधून साप काढला आणि त्याला मारून टाकलं. त्यानंतर चंदनला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तोपर्यंत सापाचे विष शरीरात पसरले होते. यामुळे चंदनचा आधीच मृत्यू झाला होता. पोलिसांनी मृतदेहाचे पोस्टमार्टम करून तो कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. यामुळे सर्वच शोकाकुल आहेत.
वडील वारले, आई सोडून गेली

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या वडिलांचे दीड वर्षांपूर्वी निधन झाले. तर चार महिन्यांपूर्वी चंदनची आई मुलीसह घरातून निघून गेली होती. तेव्हापासून तो त्याच्या मोठ्याकाकांकडे राहत होता. गावातील सरकारी शाळेत नववीत शिकत होता. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

प्रायव्हेट पार्टवर केला दंश
चंदनला चावलेला साप खूपच विषारी होता. त्यामुळेच साप चावल्यानंतर लगेचच त्याचा मृत्यू झाला. अर्थात, कुटुंबीयांनी तातडीने त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले. पण तेवढ्यात त्याच्या तोंडातून फेस येत होता. शरीर निळे पडले होते. त्याच्या प्रायव्हेट पार्टला साप चावला होता. त्याला रुग्णालयात आणण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता असे डॉक्टरांनी सांगितले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.