Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

एक Tweet खेळ खल्लास, पूजा खेडकर प्रकरण उघडकीस आणणारा वैभव कोकाटे आहे तरी कोण? वाचाच

एक Tweet खेळ खल्लास, पूजा खेडकर प्रकरण उघडकीस आणणारा वैभव कोकाटे आहे तरी कोण? वाचाच 


सध्या देशभरात वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरण खूप गाजत आहे. पूजा खेडकरविरोधात आता केंद्रीय लोकसेवा आयोगाने कारवाईचा बडगा उगारला आहे. मात्र हे पूजा खेडकर प्रकरण सगळ्यात आधी वैभव कोकाट  या तरुणाने सर्वांसमोर आणले. त्याच्या एक ट्वीटमुळे सगळे चित्र बदलले. एका ट्वीटमुळे आयएएस अधिकाऱ्याची नोकरी जाईल, असा विचार मी कधी स्वप्नातही केला नव्हता,असे कोकाट यांनी सांगितलं आहे. 

पूजा खेडकर ही निवृत्त सनदी अधिकाऱ्याची मुलगी आहे. तिने बनावट जात प्रमाणपत्र तसेच अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवले आणि आयएएस रँकही मिळवला. पूजा खेडकर प्रकरणानंतर यूपीएससीसह केंद्र आणि राज्यातील प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. 

कसे समोर आले पूज खेडकर प्रकरण ?
वैभव कोकाट यांनी पूजा खेडकर प्रकरण समोर आणले. ते म्हणाले, पूजा यांच्या विचित्र वागणुकीबद्दल पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी राज्य सरकारकडे एक अहवाल पाठवला होता. मला एका मित्रामुळे तो अहवाल वाचायला मिळाला. 

अहवाल वाचल्यानंतर एक प्रशिक्षणार्थी अधिकारी इतका माज कसा दाखवू शकतो, याचं मला आश्चर्य वाटलं. त्यानंतर मी या प्रकरणाची आणखी थोडी माहिती गोळा केली. पूजाने ऑडी कारवर बेकायदेशीररित्या अंबर दिवा लावला होता. मला या गाडीवर दिवा लावल्याचे फोटो मिळवण्यात यश आलं. या प्रकरणात पोलिसांकडे न जाता मी सोशल मीडियावर पोस्ट करण्याचा निर्णय घेतला. कारण प्रशासन तिला पाठीशी घालेल, असं मला वाटत होतं.

वैभव यांनी पूजा खेडकरविषयीची माहिती 6 जुलैला फोटोसह 'एक्स'वर शेअर केली. प्रसारमाध्यमांनी या पोस्टची दखल घेतली. त्यानंतर पूजाविषयीच्या अनेक गोष्टींचा खुलासा झाला. अनेक सामाजिक आणि माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी वैभव यांना फोन केले. त्यानंतर पूजा यांनी केलेले अनेक गैरप्रकार उघड झाले. राष्ट्रीय पातळीवर या प्रकरणाची दखल घेतल्यानंतर केंद्र व राज्य सरकारनेही या प्रकरणात लक्ष घातले आणि कारवाईची सूत्रे वेगाने फिरली.
खेडकर प्रकरणानंतर वैभव यांच्याकडे तक्रारींचा पाऊस

खेडकर प्रकरणानंतर स्पर्धा परीक्षांतील अनियमितता तसेच नियुक्त्यांबद्दलच्या अनेक तक्रारी वैभव यांच्याकडे येत आहेत. प्रकल्पग्रस्त उमेदवारांच्याही काही तक्रारी येत आहेत. या प्रकरणाचा अनेक आयएएस अधिकाऱ्यांनी धसका घेतला आहे. काही जणांनी सोशल मीडिया अकाऊंट डिलीट केलं तर काही जणांनी सोशल मीडियावर लिहिणं बंद केलं आहे.

वैभव कोकाट नेमके कोण आहेत ?
हे प्रकरण शोधून काढणारे वैभव कोकाट हे बीड जिल्ह्यातील रहिवासी आहेत. सामाजिक आणि राजकीय विषयांवर ते नेहमी मोकळेपणाने लिहित असतात. वैभव यांनी एका पीआर कंपनीतही काम केले आहे. त्यांच्या एक्स हॅण्डलला 29 हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.