तब्बल एक-दोन नव्हे तर 13 पोलीस अधिकाऱ्यांच्या घरात चोरी :, पोलसानंचीचं घरेच असुरक्षित
चोर आणि पोलीस यांच्यात नेहमी द्वंद सुरु असते. परंतु चोरटे कधी पोलिसांच्या घरात चोरी करण्याची हिंमत करत नाही. मुंबईतील या चोरट्यांनी मुंबई पोलिसांच्या घरातच डल्ला मारला. मुंबई पोलीस अधिकाऱ्यांच्या माहीम येथे असणाऱ्या पोलीस कॉलनीतील तेरा पोलिसांच्या घरात चोरी केली. या चोरट्यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या घरातून रोकड आणि मौल्यवान वस्तू सोबत
देवाच्या चांदीच्या मूर्तीची चोरी केली. यामुळे पोलीस अधिकाऱ्यांनावरच
मोहीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा प्रसंग आला.
पोलिसांच्या बंद घरांना लक्ष
राज्यात गुन्हे वाढत चालले आहे. गुंडांच्या टोळ्याही वाढल्या आहेत. भुरटे चोरटे ठिकाठिकाणी चोऱ्या करत असतात. परंतु एखाद्या पोलीस कॉलनीत जाऊन हातसफाई करणारे चोरटे हिंदी चित्रपटातच दिसले. मात्र, आता मुंबई पोलिसांना या चोरट्यांनी नाकीनऊ आणले आहे. चोरट्यांनी रात्रपाळीवर असलेले पोलीस कर्मचारी, सुट्टीनिमित्त गावी गेलेल्या पोलिसांची घर तसेच निवृत्त पोलिसांच्या बंद घरांना लक्ष केले. या घरांमधील वस्तू चोरऱ्या. तसेच पोलीस कॉलनीच्या शेजारील वसाहतीतील प्ले ग्रुप, नर्सरी आणि वसाहतीच्या कार्यालयांमध्ये देखील चोरांनी चोरी केली. आता माहीम पोलीस त्या चोरांचा शोध घेत आहे.
सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
माहीम पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, 16 ते 17 ऑगस्ट दरम्यान चोरट्यांनी 13 पोलीस अधिकाऱ्यांकडे चोरी केली. ज्या घरांमध्ये चोरी झाली, त्या घरातील अधिकारी घरात नव्हते. घर बंद असल्याची संधी साधून ही चोरी केली गेली. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत. त्यातून चोरांचा शोध घेतला जाणार आहे. चोरांनी पोलीस कर्मचाऱ्यांची घरे लक्ष केल्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला आहे. पोलीस वसाहत सुरक्षित नसेल तर सर्वसामान्य व्यक्तींची घरे कशी सुरक्षित राहणार? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.