Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वैद्यकीय इतिहासातील सर्वात मोठा शोध; अंधांना दृष्टी देणारं जादुई औषध

वैद्यकीय इतिहासातील सर्वात मोठा शोध; अंधांना दृष्टी देणारं जादुई औषध
 

नवी दिल्ली : आतापर्यंत कॅन्सर पूर्णपणे बरा करणारी औषधं तयार करणं आधुनिक वैद्यकशास्त्राला शक्य झालेलं नाही. मात्र, याबाबत आता संशोधकांना मोठ यश मिळालं आहे. सध्या जर सुरुवातीच्या स्टेजमध्ये कॅन्सरचं निदान झालं तर त्यावर उपचार करता येतात.

पण, अंधत्व आल्यानंतर पुन्हा दृष्टी मिळवून देणारं औषध अद्याप तयार झालेलं नाही. त्यामुळे ब्रिटनमधील हे औषध किंवा थेरपी, अँटिबायोटिक पाठोपाठ वैद्यकीय इतिहासातील सर्वात मोठं यश ठरेल, असं म्हटलं जात आहे.

शास्त्रज्ञ 1960 पासून जीन एडिटिंगचे प्रयोग करत आहेत. गेल्या दशकात शास्त्रज्ञांनी CRISPR-Cas9 सिस्टीम शोधून काढली. या सिस्टीमच्या मदतीने जीन एडिटिंगला वेग मिळाला आहे. या पद्धतीत खराब डीएनए सेलमधून काढून टाकण्याचा प्रयत्न केला जातो. खराब डीएनए मॉलिक्युलर कात्रीच्या मदतीने बाहेर काढून त्याच्या जागी नवीन डीएनए विकसित केला जातो. या जादुई औषधाने कॅन्सरसह हार्ट डिसिजेस आणि अंधत्वावरही उपचार करता येतील. सध्या जर सुरुवातीच्या स्टेजमध्ये कॅन्सरचं निदान झालं तर त्यावर उपचार करता येतात.

डीएनएमध्ये बदल करता येणार

डेली मेलने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, हे औषध पेशींच्या आतील डीएनए बदलू शकतं किंवा त्यांची नवीन पद्धतीने रचना करू शकतं. डीएनएला आपल्या शरीराची कुंडली मानलं जातं. शरीराला कोणत्या प्रकारचे रोग होऊ शकतात, हे आधीच निश्चत असतं. डीएनएमध्ये गडबड झाल्यास कॅन्सरसह अनेक आजारांचा धोका वाढतो. या नवीन औषधाने कॅन्सरसह हाय कोलेस्टेरॉल, डार्ट डिसिजेस आणि अंधत्वावर देखील उपचार करता येतील.

ब्रिटनमधील काही रूग्णांवर त्याचा वापर देखील सुरू झाला आहे. ब्रिटिश सरकारमधील नॅशनल हेल्थ सर्व्हिसने (एनएचएस) याबाबत अधिक चांगल्या संशोधनासाठी 1.7 अब्ज पाउंड खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. आनुवंशिक हार्ट डिसिजेस, ल्युकेमिया म्हणजेच ब्लड कॅन्सर, युरिनरी इन्फेक्शन यांसारख्या आजारांवर या औषधाच्या मदतीने उपचार केले जातील.

ट्रायल यशस्वी
अहवालात असं म्हटलं आहे की, या थेरपीच्या मदतीने काही आजारांवर उपाचर करण्याच्या चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. 31 वर्षीय पुरुषावर जीन एडिटिंगद्वारे 'हिमोफिलिया बी'साठी यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. येत्या तीन वर्षांत ही उपचार पद्धती जगातील कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्यामुळे हजारो लोकांचे प्राण वाचू शकतील, असा दावा संशोधकांनी केला आहे.

फ्रान्सिस क्रिक इन्स्टिट्युटमधील जेनेटिक एक्सपर्ट प्रोफेसर रॉबिन लव्हेल बेझ यांनी सांगितलं की, जीन एडिटिंग थेरपी हे भविष्यात उपयुक्त ठरणारं औषध आहे. अपेक्षेप्रमाणे दुर्धर आजारांवर ही उपचार पद्धती यशस्वी ठरली, तर ही जगातील सर्वोत्तम उपचारपद्धती ठरेल. लाखो रुग्णांना जीवदान मिळू शकेल. हे औषध तयार करण्यासाठी ब्रिटिश सरकार 1.7 अब्ज पाउंड म्हणजेच सुमारे 184 अब्ज रुपये खर्च करत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.