दौंडमधील शालेय विद्यार्थिनींवरील अत्याचार प्रकरणात शाळेच्या मुख्याध्यापकाला अटक; मुख्य आरोपी फरार, पोलीस मागावर
दौंड,ता. 22 : मळद (ता. दौंड) गावात आठ ते नऊ शालेय विद्यार्थिनींचे शिक्षकाकडून लैंगिक शोषण झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी भैरवनाथ माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकाला अटक करण्यात आली आहे.
अशी माहिती दौंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली आहे. सुभाष भीमराव वाखारे असे अटक करण्यात आलेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे. तर मुख्य आरोपी बापूराव धुमाळ हा फरार झाला असून पोलीस त्याच्या मागावर आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, भैरवनाथ माध्यमिक विद्यालयात आरोपी बापूराव धुमाळ हा इंग्रजी विषयाचे अध्यापन करीत आहेत. आरोपी बापूराव धुमाळ याने सातवी, आठवी आणि नववीमध्ये शिकत असणाऱ्या आठ ते नऊ विद्यार्थिनींना व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल आणि इतर साधनांचा वापर करत अश्लील फोटो काढून ब्लॅकमेल आणि अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पालकांनी याअगोरच ही गंभीर बाब शाळेचे मुख्याध्यापक सुभाष वाखारे यांना सांगितली होती. मात्र मुख्याध्यापकांनी याकडे दुर्लक्ष केल्याने आरोपी बापूराव धुमाळ याचे फावले व त्यानंतर त्याने याचा फायदा घेऊन पुन्हा विद्यार्थिनीवर अत्याचार केला.दरम्यान, हा प्रकार पालकांना समजल्यानंतर शाळेमध्ये जाऊन संतप्त पालकांनी शाळा प्रशासनाला जाब विचारला. या घटनेची माहिती मिळताच, दौंड पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सुभाष वाखारे यांना अटक केली आहे. तर मुख्य आरोपी बापूराव धुमाळ हा फरार झाला असून पोलीस आरोपीच्या मागावर आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.