पत्नीने मंगळसुत्राने गळा आवळून केली पतीची हत्या, कारण आलं समोर
चेन्नई : घरगुती वादातून महिलेनं पतीची हत्या केलीय. पत्नीने मंगळसुत्राने पतीचा गळा आवळून केलेल्या हत्येने खळबळ उडाली आहे. तामिळनाडुतील ही घटना असून या प्रकरणी पोलिसांनी महिलेला अटक केलीय. तिच्यावर हत्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.
तामिळनाडुच्या त्रिप्लिकेन इथं २८ वर्षीय के मनिवन्नण त्याच्या ३५ वर्षांच्या पत्नीसोबत राहत होता. ती ग्रेटर चेन्नई कॉर्पोरेशनमध्ये कर्मचारी आहे. याआधीही तिची दोन लग्न झालं होती. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार मणिवन्नन जेव्हा दारुच्या नशेत मंगळवारी रात्री घरात आला तेव्हा पती-पत्नीमध्ये वाद झाले.पोलिसांनी नगम्मलसह तिची बहीण आणि बहिणीचा नवरा यांना ताब्यात घेतलं होतं. चौकशीत नगम्मलने पोलिसांना सांगितलं की, पती सतत त्रास देत असे. तो मारहाण करायचा. यामुळे रागाच्या भरात हत्या केली. हत्या प्रकरणी नगम्मलला पोलिसांनी अटक केली असून तिच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
पतीसोबत वाद होताच पत्नीने मंगळसुत्राच्या सहाय्याने पतीचा गळा आवळला. मणिवन्नन बेशुद्ध पडल्यानंतर नगम्मल घाबरली. तिने घाई गडबडीत बहीण अबिरामी हिला फोन केला. यानंतर अबिरामी आणि तिच्या पतीने मणिवन्ननला रुग्णालयात नेलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. त्याच्या गळ्यावर व्रण पाहून रुग्णालयाने याची माहिती पोलिसांना दिली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.