Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी घेणारी फेसबुक पोस्ट तुफान व्हायरल, बिश्नोई गँगशी संबंध?

बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी घेणारी फेसबुक पोस्ट तुफान व्हायरल, बिश्नोई गँगशी संबंध?
 

शनिवारी रात्री माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या हत्येमागे बिश्नोई गँग असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, लॉरेन्स बिश्नोई गँगने बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारल्याची एक फेसबुक पोस्ट व्हायरल झाली आहे.

मात्र ही फेसबुक पोस्ट बिश्नोई गँगनेच केली आहे अथवा कोणी खोडसाळपणा केला आहे हे अजूनही स्पष्ट झाले नाही. दरम्यान, शुब्बू लोणकर नावाच्या अकाऊंटवरून ही फेसबुक टाकली असून ही पोस्ट तुफान व्हायरल होत असून बाबा सिद्दीकी यांचे अभिनेता सलमान खान आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम यांच्याशी असलेल्या संबंधामुळे त्यांची हत्या केली असल्याचं लिहिलं आहे. 

काय लिहिलंय या फेसबूक पोस्ट मध्ये?
 
"ओम जय श्री राम जय भारत जीवनाचे मूळ समजते. शरीर आणि धनाला धूळीसमान मानतो. जे केले ते सत्कर्म होते. मैत्रीचा धर्म पाळला. सलमान खान आम्हाला हे युद्ध नको होते. पण तू आमच्या भावाचे नुकसान केले. आज ज्या बाबा सिद्दीकीचे कौतुक होत आहे, तो एकेकाळी दाऊदसोबत मकोका गुन्ह्यात सहभागी होता. अनुज थापन आणि दाऊद इब्राहिमला बॉलिवूड, राजकारण, प्रॉपर्टी डीलिंगशी जोडल्यामुळे त्याची हत्या झाली. आमची कुणाशीही दुश्मनी नाही. पण जो कुणी सलमान खान आणि दाऊद गँगची मदत करेल. त्याने आपला हिशोब लिहून ठेवावा. आमच्या कोणत्याही मित्राला जर मारले तर आम्ही प्रतिक्रिया देणारच. आम्ही पहिला वार कधीच नाही केला. जय श्री राम जय भारत शहीदांना सलाम."

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.