राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांचे जावई समीर खान यांचं निधन
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचे शनिवारी (दि. १२) रात्री निधन झाले. काही दिवसांपूर्वी त्यांचा अपघात झाला होता. मुंबईतील क्रिटी केअर या रुग्णालयासमोर त्यांच्याच ड्रायव्हरने त्यांच्यावर
गाडी घातली होती. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.
नवाब मलिक यांची मुलगी निलोफर खान व जावई समीर खान हे १७ सप्टेंबर रोजी कुर्ला येथील क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये रेग्युलर चेकअप करून परत घरी जात होते. यावेळी त्यांची कार चालक अबुल मोहम्मद सोफ अन्सारी (वय ३८) चालवत होता. चेकअप होऊन निलोफर आणि समीर बाहेर आले. तेव्हा चालक कारमध्ये झोपला होता. त्यांनी गाडी रुग्णालयातून बाहेर येणाऱ्या गेटवर बोलवली.यावेळी गाडीमध्ये दोघे पती-पत्नी बसत असताना चालकाकडून अचानक एक्सीलेटरवर पाय ठेवला गेल्याने ही कार समीर खान यांना फरकटत नेऊन समोर एचडीआयएल वसाहतीच्या संरक्षण भिंतीजवळ जाऊन आदळली. या अपघातात समीर खान गंभीर जखमी झाले होते. तर निलोफर यांच्या हाताला दुखापत झाली होती. दोघांनाही क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल केले असता समीर यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. निलोफर यांच्यावर उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आले. तेव्हापासून समीर यांच्यावर उपचार सुरू होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.