"मराठे इतके जमलेत की नारायण गडावर पाय ठेवायलाही जागा नाही"
मराठा आरक्षणासाठी वर्षभरापासून लढा देणारे मनोज जरांगे पाटील आज बीडच्या नारायण गड येथे दसरा मेळावा घेणार आहेत. तब्बल ९०० एकरावर हा दसरा मेळावा पार पडणार असून २०० एकरमध्ये वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
यापार्श्वभूमीवर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, या मेळाव्यासाठी राज्यभरातून अनेक मराठा बांधव दाखल झाले आहेत. नारायण गडावर दाखल होताच मराठा बांधवांनी एक मराठा लाख मराठा असा घोषणा सुरु केल्या आहेत.
त्यामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला आहे. अगदी थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील यांचे नारायण गडावर आगमन होणार आहे. त्याआधी साम टीव्हीने नारायण गडावरील मराठा बांधवांसोबत संवाद साधला. यावेळी मराठा बांधव म्हणाले की, "मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आमचा पहिलाच दसरा मेळावा आहे. नारायण गडावर होणाऱ्या या मेळाव्याला पहिल्याच वर्षी उदंड प्रतिसाद मिळत आहे".
"मेळाव्याला येणाऱ्या मराठा बांधवांची ठिकठिकाणी जेवणाची तसेच नाष्ट्याची सोय करण्यात आली आहे. नारायण गडावर मराठे इतके जमलेत की पाय ठेवायलाही जागा नाही. जिथे जिथे जागा मिळेल तिथेच मराठा बांधव बसत आहेत. या गडावरून मनोज जरांगे पाटील आम्हाला काहीतरी मोठा संदेश अशी अपेक्षा आम्हाला असल्याचं एका मराठा बांधवाने सांगितलं आहे".
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.