कवठेगुलंद : बुबनाळ ता. शिरोळ येथे विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झाली होती. मतदान केंद्राबाहेर चांगली गर्दी पाहायला मिळत होती. यावेळी बुबनाळ या गावात एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.
मतदान करून आपल्या जयसिंगपूर गावी परत जात असताना एका मतदानकर्त्याचा मोटरसायकल वरून जात असताना हृदयविकाराचा झटका आल्याने जागेवरतीच मृत्यू झाला आहे. राजेंद्र रुद्राप्पा ऐनापुरे असे मृत शिक्षकाचे नाव आहे.
मतदानाचा हक्क बजावून आपल्या जयसिंगपूर गावी दुपारी 3 वाजता परत जात असताना राजेंद्र रुद्राप्पा ऐनापुरे यास मोटरसायकल वरती अचानक चक्कर आल्याने गाडीवरून कोसळले. त्यानंतर तातडीने त्यांना सांगली सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.