नाशिक : विमा कंपनीच्या एजंटसंदर्भातील नव्या धोरणाविरोधात ऑल इंडिया लाइफ इन्शुरन्स एजंट फेडरेशनतर्फे एलआयसीच्या विभागीय कार्यालयासमोर मंगळवारी (ता. १७) आंदोलन केले. आंदोलकांनी एलआयसीच्या विभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
विभागीय अध्यक्ष कैलास चव्हाण यांनी नेतृत्व केले. आंदोलनात वेगवेगळ्या शाखांमधील विमा एजंट आणि प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने सहभाग घेत या निर्णयाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. एलआयसीच्या धोरणांमध्ये सुधारणा होईपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार या वेळी आंदोलकांनी व्यक्त केला.
विमा एजंटांच्या प्रमुख मागण्या
- कमिशनचे दर मागे घ्यावेत. २ व ५ टक्के कमिशनचा दर गैरलागू आहे.- क्लॉबॅक कलम (CLAW BACK CLAUSE) रद्द करावे, नवीन योजनांमध्ये समाविष्ट करणे अन्यायकारक.- किमान विमा रक्कम वाढवून एक लाख करावी.- वयोमर्यादा ६० वर्षांपर्यंत वाढवावी, यामुळे अधिक ग्राहकांना विमा सुरक्षितता मिळेल.- प्रीमियम दर कमी करावेत.- व्याजदरात सुधारणा करावी.- आर्थिक व्यवहारांवरील चक्रवाढ व्याजदर ४ टक्के साध्या व्याजदरावर आणावा.आदी मागण्यासाठी हे आंदोलन केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.