Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जळगावातल्या लॉजवर अचानक पडले छापे, तरुणीची 'ओळख' समजताच पोलीसही हादरले

जळगावातल्या लॉजवर अचानक पडले छापे, तरुणीची 'ओळख' समजताच पोलीसही हादरले
 
 
जळगाव : जळगावातल्या हॉटेलमध्ये चालणाऱ्या कुंटणखाण्यावर पोलिसांनी छापा टाकला आहे. या छापेमारीदरम्यान पोलिसांना एक तरुणी सापडली, या तरुणीकडे पोलिसांनी तिची कागदपत्र मागितली, पण या तरुणीने दिलेल्या माहितीमुळे एकच खळबळ उडाली आहे.

जळगावच्या लॉजवर सापडलेली ही तरुणी बांगलादेशी नागरिक आहे. या बांगलादेशी तरुणीकडे भारतात येण्यासाटी लागणारे अधिकृत पासपोर्ट आणि व्हिजासह कोणतीही कागदपत्र उपलब्ध नाहीयेत. याप्रकरणी हॉटेल चालक आणि व्यवस्थापकासह तिघांना अटक करण्यात आली आहे.

जळगाव ते भुसावळ राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या हॉटेल चित्रकूट येथे सुरू असलेल्या कुंटणखाण्यावर पोलिसांनी छापा टाकला. या छापेमारीमध्ये पोलिसांनी हॉटेल चालक, व्यवस्थापक आणि त्यांना मदत करणाऱ्या तीन जणांना अटक केली आहे.

पोलिसांनी या कारवाईदरम्यान हॉटेलमधून एका महिलेला आणि तिथून जवळच असलेल्या हॉटेल यश येथून अन्य एका तरुणीला ताब्यात घेतलं आहे. निलेश राजेंद्र गुजर, चेतन वसंत माळी, विजय सखाराम तायडे या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

जळगाव पोलिसांनी बांगलादेशी तरुणीसह अन्य एका महिलेला आशादीप वसतीगृहात रवाना केलं आहे. लॉजवर सापडलेली तरुणी बांगलादेशची राजधानी ढाकाची रहिवासी आहे. भारतात येण्यासाठी लागणारी अधिकृत पासपोर्ट, व्हिजा आणि इतर कोणतीही कागदपत्र या महिलेकडे नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.