Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'परेड फेम' पुण्याचे आयुक्त अमितेश कुमार पुन्हा फेल? स्टेशनमध्ये बसले पण वाघ जीवाशी गेले!

'परेड फेम' पुण्याचे आयुक्त अमितेश कुमार पुन्हा फेल? स्टेशनमध्ये बसले पण वाघ जीवाशी गेले!
 

पुणे : कोणत्याही प्रकारचा गुन्हा करायचा नाही किंवा शहाणपणा करायचा नाही, केला तर याद राखा, अशा शब्दांत दम देणाऱ्या आणि गावगुंड म्हणून वावणाऱ्यांची परेड अशी ख्याती मिळवलेल्या आयुक्त अमितेश कुमार  यांची टीम पुन्हा एकदा फेल झाल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे.

याचे कारण सत्ताधारी भाजप पक्षाच्या सख्ख्या आमदाराच्या मामाचे अपहरण झाले दिवसभर पोलीसांनी अख्खं पुणं पालथं घातलं तरी 12 तासात एकही क्लू सापडला नाही. अखेर सतीश वाघ यांचा मृतदेहच त्यांच्या घरापासून 40 किलोमीटर अंतरावर सापडला.

कधीकाळी शांत सुरक्षित समजलं जाणार पुणे शहर आज अशांत असुरक्षित वाटू लागलंय. त्याचं कारण म्हणजे शहरात वाढत असलेली गुन्हेगारी. कधी भरचौकात गोळीबार, कधी मध्यरात्री बिनधास्त कोयते नाचवणारी मुले, टोळ्यांची भांडण, ड्रग्जची प्रकरणे, छोट्या मोठ्या घटनांचा तर उल्लेखच नको कारण रोज काही ना काही पुण्यात घडतच आहे.त्यामुळे पुणे हे शिक्षणाचे माहेर घर आहे की क्राईम कॅपिटल असाच प्रश्न उपस्थित होत आहे.

पुण्याची वाटचाल क्राईम कॅपिटलकडे?
गेल्या वर्षभरात अशा अनेक घटना शहराच्या वेगवेगळ्या भागांत घडल्या आहेत, आजही घडत आहेत. या घटनांमुळे सर्वसामान्य नागरिक भयभीत आहेत. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात देखील पोलीसांच्या कर्तव्यात कसूर दिसली. पोलिसांचा पहारा असताना ललित पाटील फरार झाला.
पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी प्रकरणे

कल्याणीनगर पोर्शे अपघात प्रकरणात धनिकपुत्राची अल्कोहोल चाचणी नकारात्मक असल्याचा अहवाल पोलिसांनी दिला आहे. अल्पवयीन असलेला आरोपी दारू पित असल्याचे CCTV फुटेज असून ही अहवाल नकारात्मक आल्याने पोलिसांच्या तपासावर त्यावेळी देखील प्रश्न चिन्ह उपस्थित झाले होते. त्यानंतर आता पुन्हा सतिश वाघ यांचे अपहरण आणि त्यांचा मृतदेह हाती लागणे, मारेकऱ्याचा कोणताही पुरावा हाती लागणे यामुळे पुन्हा एकदा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे.

सतीश वाघ प्रकरणात पुणे पोलिसांचे अपयश?
पुण्यातील अट्टल गावगुंडाची धिंड काढणारे पोलिस ऑफिसर अमितेश कुमार यांनी कल्याणीनगर पोर्शे प्रकरणात पुणे पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेपेक्षा आणखी जास्त कडक भूमिका कोणी सुचवत असेल तर त्यांच्याशी चर्चा करण्याची आमची तयारी आहे, असे चॅलेंज दिले होते. त्यामुळे आता आमदार योगेश टिळेकरांचे मामा सतीश वाघ प्रकरणात 12 तासात अपहरणाचा एकही लीड पुण्याच्या पोलिसांच्या हाती न लागणे हे देखील अपयश आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.