एकाला भेटायला गेली अन् 7 जणांनी साधला डाव, अल्पवयीन मुलीसोबत रात्रभर घडला भयंकर प्रकार
एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर कॉलेजच्या सात विद्यार्थ्यांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित मुलगी रविवारी आपल्या एका मित्राला भेटायला गेली होती. पण ज्या मित्रावर विश्वास ठेवला, त्याच मित्राने पीडितेचा घात केला आहे. पीडित मुलीवर रात्रभर सात विद्यार्थ्यांनी लैंगिक अत्याचार केला आहे. दुसऱ्या दिवशी पीडित मुलगी घरी आल्यानंतर हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींला अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
संबंधित घटना तमिळनाडूच्या कोइंम्बतूर येथे घडली आहे. इथं आपल्या आजीसोबत राहणारी 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी रविवारी सोशल मीडियावर ओळख झालेल्या एका मित्राला भेटायला गेली होती. रविवारी ती घरातून गेली होती, मात्र रात्री उशिरापर्यंत ती घरी आली नाही. तिच्या घरच्यांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, पण तिचा काहीच थांगपत्ता लागला नाही. नातेवाईकांनी तिच्या फोनवर संपर्क साधला, मात्र तिचा मोबाईलही स्वीच ऑफ लागत होता. यामुळे घाबरलेल्या पीडितेच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.
एक 17 वर्षांची मुलगी असं अचानक बेपत्ता झाल्याने पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत, तपासाची चक्र फिरवली, मात्र तिचं लोकेशन शोधण्यात पोलिसांना देखील यश आलं नाही. दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी पीडित मुलगी स्वत:हून घरी परतली. यावेळी पोलिसांनी तिला ताब्यात घेत, तिची चौकशी केली. यावेळी पीडितेनं सांगितलेलं ऐकून पोलीसही हादरले.पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी सातही आरोपींविरोधात पोक्सो कायद्यासह गुन्हा दाखल केला. सोमवारी सातही आरोपींना पोलिसांनी अटक केली. संबंधित आरोपींना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली असून कोइंम्बतूर मध्यवर्ती कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली आहे. एका 17 वर्षीय मुलीवर अशाप्रकारे सात जणांनी अत्याचार केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अॅक्टीव्ह होती. तिने इन्स्टाग्राम आणि स्नॅपचॅटवर काही नवीन मित्र जोडले होते. दरम्यान, अलीकडेच तिच्या सोशल मीडियावरील दोन मित्रांनी तिला भेटायला बोलावलं होतं. तिने सहमती दर्शवल्यानंतर यातील एक मित्र तिला घेण्यासाठी दुचाकीवर आला. तिला घेऊन तो कुनुयामुथूर परिसरातील एका रुमवर घेऊन गेला. याच रुममध्ये सात कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.