Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बीड पुन्हा हादरलं ! शरिरावर घाव, तोंड कपड्याने बांधलेलं, बीडमध्ये मृतदेह सापडल्याने खळबळ

बीड पुन्हा हादरलं ! शरिरावर घाव, तोंड कपड्याने बांधलेलं, बीडमध्ये मृतदेह सापडल्याने खळबळ
 

बीड : मागच्या काही दिवसांपासून गुन्ह्यांच्या घटनामुळे चर्चेत आलेल्या बीडमध्ये मृतदेह सापडल्यामुळे खळबळ माजली आहे. बीडच्या मांजरसुंबा येथे राष्ट्रीय महामार्गालगत एक मृतदेह सापडला आहे.

या मृतदेहाच्या शरिरावर जखमा आहेत, तसंच तोंडही बांधलेलं आहे. हत्या करून हा मृतदेह रस्त्यावर टाकून दिल्याचा संशय पोलिसांना आहे. बीड तालुक्यातील मांजरसुंबा परिसरात एका ट्रक चालकाचा मृतदेह आढळला आहे. धुळे-सोलापूर महामार्गालगत एका शेतात कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथील मोहम्मद सलीम या 55 वर्षांच्या ट्रक चालकाचा मृतदेह आढळला. या मृतदेहाच्या शरिरावर मोठे घाव आहेत, तर तोंडाला गमजाने बांधलेलं आहे, त्यामुळे घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.

बीडमध्ये वाढती गुन्हेगारी
बीड जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी चिंतेचा विषय बनली आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील गुन्हेगारीने महाराष्ट्रातील राजकारण तापलं. आवादा कंपनीकडे मागितल्या गेलेल्या खंडणीला विरोध केला म्हणून संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं, याप्रकरणी वाल्मिक कराडला अटक करण्यात आली आणि त्याच्यावर मोक्का लावला गेला.

संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर बीड जिल्ह्यातील गन कल्चरची प्रकरणंही समोर येऊ लागली. परवाना नसतानाही बेधडकपणे बंदूक दाखवून दहशत माजवणारे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. काहीच दिवसांपूर्वी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंच्या विरोधातल्या बातम्या बघतो म्हणून एका तरुणावर जीवघेणा हल्ला केला गेला, ज्यात हा तरुण गंभीर जखमी झाला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.