अरुण गवळीला न्यायालयाचा झटका!
सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी गँगस्टर अरुण गवळी याचा जामीन अर्ज फेटाळून लावला. गवळी एका नगरसेवकाच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. त्यामुळे त्याची जामिनावर सुटका होण्याची शक्यता मावळली आहे. अरुण गवळीला २००७ साली मुंबईतील शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. या प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती, जी तो सध्या भोगत आहे.
गवळीने जामिनासाठी अर्ज करताना, २००६ च्या क्षमा धोरणातील सर्व अटींचे पालन केल्याचा दावा केला होता. मात्र, न्यायालयाने त्याचा हा युक्तिवाद फेटाळून लावला. गवळीच्या जामीन अर्जाला विरोध करण्यात आला. न्यायालयाने सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर गवळीचा जामीन अर्ज फेटाळण्याचा निर्णय दिला. जामीन अर्ज फेटाळल्यामुळे अरुण गवळीला तुरुंगातच राहावे लागणार आहे. नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येचा आरोप त्याच्यावर सिद्ध झाला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.