धक्कादायक! दाजीसोबत अल्पवयीन मेहुणीला शरीरसंबंध ठेवण्यास पाडलं भाग
सोलापूरः एका युवतीचं लग्न झाल्यानंतर तिने सातच दिवसांत सासरच्या त्रासाला कंटाळून घर सोडले होते. या प्रकारानंतर सासरच्या मंडळींनी पीडित युवतीच्या अल्पवयीन बहिणीचा जबरदस्तीने विवाह लावत तिला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी भाग पाडले आहे. याप्रकरणी पाच जणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पीडित मुलगी सोलापूर शहाराच्या फौजदारी चावडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहते. काही दिवसांपूर्वी पीडितेच्या बहिणीचे एका युवकासोबत कुटुंबीयांच्या सहमतीने लग्न झालं होते. पण लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवसांपासून सासरच्या मंडळींनी संबंधित युवतीला त्रास द्यायला सुरुवात केला. सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून पीडितेची बहिणी सासरचं घर सोडून निघून आली. या प्रकारानंतर सासरच्या मंडळींनी पीडित मुलीच्या आई-वडिलांवर दबाव टाकत अल्पवयीन मुलीला लग्न करण्यास भाग पाडले. संपूर्ण कुटुंबावर दबाव टाकत आरोपींनी अल्पवयीन मुलीचा विवाह लावला. आरोपींनी पीडित मुलीला आपल्याच दाजीसोबत शरीरसंबंध ठेवण्यास देखील भाग पाडले. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी किरण सुरेश चव्हाण, सुरेश शिवराज चव्हाण, नितीन सुरेश चव्हाण, कविता चव्हाण यांच्यासह अन्य एका विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विनयभंग आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. एका अल्पवयीन मुलीचे जबरदस्तीने लग्न लावत, तिला शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.