'. आणि तिथेच अरविंद केजरीवाल यांची चूक झाली', प्रशांत किशोर यांनी सांगितलं दिल्लीतील 'आप'च्या पराभवाचे कारण
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा 70 पैकी 48 जागांवर विजय झाला आहे. तर आम आदमी पक्षाचे (आप) 22 उमेदवार निवडून आले आहेत. काँग्रेसला पुन्हा एकदा अपयश आले आहे. 'आप'च्या या पराभवाची अनेक कारणं आहेत. यावर आता जन सुराज पक्षाचे प्रमुख आणि निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी भाष्य केले आहे.
मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणे, अँटी-इनकंबन्सी आणि इंडिया आघाडीत आधी सहभागी होऊन नंतर निवडणूक एकट्याने लढण्याचा निर्णय ही आपच्या पराभवाची प्रमुख कारणं असल्याचे प्रशांत किशोर म्हणाले. एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना ते म्हणाले की, अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणे ही एक मोठी धोरणात्मक चूक होती. यामुळे पक्षाला मोठे नुकसान सहन करावे लागले.
प्रशांत किशोर पुढे म्हणाले की, 'ते आधी इंडिया आघाडीमध्ये सहभागी झाले. मात्र, नंतर दिल्ली निवडणूक एकट्याने लढण्याचा निर्णय घेतला. याशिवाय, 10 वर्षांची अँटी-इनकंबन्सी होती. सर्वात मोठी चूक म्हणजे केजरीवाल यांनी दिलेली राजीनामा.' 'केजरीवाल यांनी मद्य धोरण प्रकरणात अटक झाल्यानंतर त्वरित राजीनामा द्यायला हवा होता. मात्र, त्यांनी जामीन मिळाल्यानंतर आणि निवडणुकीपूर्वी कोणाला तरी मुख्यमंत्री बनवणे ही त्यांच्या दृष्टीने मोठी चूक ठरली', असे ते म्हणाले.दिल्लीमध्ये आपसाठी पुन्हा राजकीय पुनरागमन करणे कठीण असेल. मात्र, हा पराभव केजरीवाल यांच्यासाठी एक चांगली संधी असल्याचे देखील ते म्हणाले. आता केजरीवाल यांच्याकडे सरकार चालवण्याची जबाबदारी नाही. ते याचा उपयोग मागील निवडणुकांमध्ये जेथे पक्षाने चांगली कामगिरी केली होती, जसे की गुजरातसारख्या राज्यांमध्ये आम आदमी पक्षाच्या विस्तारासाठी करू शकतात, असे मत प्रशांत किशोर यांनी व्यक्त केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.