Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

10 हजार कोटी घेऊन 'हा' बिल्डर देश सोडून पळाला; राऊतांचा दावा! म्हणाले, 'माजी मुख्यमंत्र्यांसाठी कुठे...'

10 हजार कोटी घेऊन 'हा' बिल्डर देश सोडून पळाला; राऊतांचा दावा! म्हणाले, 'माजी मुख्यमंत्र्यांसाठी कुठे...'
 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मोठा धक्का दिला आहे. शिंदेंच्या जवळचे मानले जाणारे बिल्डर अजय आशर यांना बाहेरचा रस्ता दाखवत 'मित्र' संस्थेच्या उपाध्यक्षपदी दोन नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील संस्थेचे नवे उपाध्यक्ष असतील. या निर्णयासंदर्भात विचारलं असता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी 'अजय अशर देश सोडून पळाले असल्याची माहिती आपल्याकडे आहे', असं म्हटलं आहे.

आमदार फोडताना आशरनेच पैशांची देवाणघेवाण केली...
"देवेंद्रजींच्या निर्णयाचा आम्ही स्वागत करतो," असं संजय राऊत यांनी या विषयावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता म्हटलं. तसेच राऊतांनी, प्रवीण परदेशी यांची नेमणूक होणं या उद्योजकांच्या समितीवर याचं आम्ही स्वागत करतो, असंही म्हटलं. पुढे बोलताना राऊत यांनी "शिवसेनेमध्ये फूट पडली त्यावेळी आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न झाला तेव्हा अजय आशर याने पैशांची देवाणघेवाण केला," असा दावा केला आहे.
अजय आशरने देशातून पलायन केलं

"अजय आशर हा एक बिल्डर होता ठाण्यातला, त्याचे उद्योग सर्वांना माहीत आहेत. आधीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संपूर्ण व्यवहार पाहणारा जमिनीचे व्यवहार करणारा आणि त्यांच्या पैशाचं संरक्षक म्हणून त्याची ओळख आहे. तीन वर्षांपूर्वी शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला तेव्हा आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न झाला तेव्हा अजय आशर याने पैशांची देवाणघेवाण केली. हजारो कोटींची संपत्ती त्यांनी बेकायदेशीरपणे गोळा केली. माझ्या माहितीत त्याने देशातून पलायन केलं आहे," असं संजय राऊत म्हणाले.

आशर आणि त्याच्या आकाची ईडी चौकशी केली पाहिजे
"राणा नावाच्या अतिरेक्याला परत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे आर्थिक गुन्हेगार आहेत यांना कधी परत आणणार? अजय आशर याला अटक करून त्याची झडती घेतली पाहिजे. माजी मुख्यमंत्र्यांसाठी कुठे आणि पैसा गोळा केला याची माहिती घेतली पाहिजे. दहा हजार कोटी घेऊन तो परदेशात स्थायिक झाला आहे. अजय आशर आणि त्याचे राजकीय आका ही ईडीची फिट केस आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करून चौकशी केली पाहिजे," अशी मागणी राऊतांनी केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.