Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आमदनी अठन्नी खर्चा रुपय्या.राज्य आर्थिक संकटात, उत्पन्नापेक्षा खर्च जास्त

आमदनी अठन्नी खर्चा रुपय्या.राज्य आर्थिक संकटात, उत्पन्नापेक्षा खर्च जास्त
 

मुंबई : राज्यासमोर आर्थिक संकट वाढले, महसुली उत्पन्नापेक्षा खर्च जास्त झाला आहे. कर्ज आणि व्याजापोटी मोठी रक्कम खर्च होत आहे. भांडवली खर्चासाठी दुसरे कर्ज काढण्याशिवाय पर्याय नसल्याचे समोर आले आहे. आर्थिक पाहणी सर्वेक्षण अहवालातून राज्याची ही बिकट परिस्थिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री तथा वित्त आणि नियोजनमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी विधिमंडळात हा अहवाल मांडला. 

महाराष्ट्राच्या 2024-25 च्या आर्थिक सर्वेक्षणानुसार महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 7.3 टक्के दराने वाढण्याचा अंदाज आहे, जो भारताच्या अंदाजे 6.5 टक्के जीडीपी वाढीपेक्षा जास्त आहे. सध्याच्या किमतींवर राज्याचे सकल राज्य देशांतर्गत उत्पादन (जीएसडीपी) 45.31 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे, तर वास्तविक जीएसडीपी 26.12 लाख कोटी रुपये असण्याचा अंदाज आहे.
कृषी आणि संलग्न क्षेत्रातील वाढ (8.7 टक्के), उद्योग (4.9 टक्के) आणि सेवा (7.8 टक्के) व्यापक विस्तार दर्शवते. महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या देशात आघाडीवर आहे, भारताच्या एकूण जीडीपीमध्ये 13.5 टक्के योगदान देत आहे. दरम्यान, दरडोई उत्पन्न 2023-24 मध्ये 2.78 लाख रुपयांवरून 2024-25 मध्ये 3.09 लाख रुपयांपर्यंत वाढण्याचे निश्चित आहे, जे संपूर्ण राज्यात उत्पन्नात वाढ दर्शवते. जून 2024 मध्ये सुरू झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे सरकारने सामाजिक कल्याणाला, विशेषतः महिलांसाठी प्राधान्य दिले आहे. डिसेंबरपर्यंत, या योजनेने 2.38 कोटी महिलांना 17505.90 कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली आहे.

राज्यातील 203 तालुक्यांमध्ये अतिरिक्त, 68 तालुक्यांमध्ये सरासरी आणि 84 तालुक्यांमध्ये अपुरा पाऊस पडला आहे. कृषी गणनेनुसार लागवड क्षेत्रात प्रचंड घट झाली. 1970-71 नुसार राज्यातील सरासरी लागवड क्षेत्र 4.28 हेक्टर होती. 2021-22 मध्ये सरासरी लागवड 1.23 हेक्टर होती. 2024-25 च्या खरीप हंगामामध्ये 157.59 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली. 2024-25 च्या रब्बी हंगामामध्ये 62.81 लाख हेक्टर क्षेत्रांवर पेरणी पूर्ण झाली आहे.

मागील वर्षाच्या तुलनेत तृणधान्ये, कडधान्ये, तेलबिया आणि कापूस यांच्या उत्पादनात अनुक्रमे 49.2 टक्के, 48.1 टक्के, 26.9 टक्के आणि 10.8 टक्के वाढ अपेक्षित आहे. मागील वर्षाच्या तुलनेत तृणधान्ये व कडधान्याच्या उत्पादनात अनुक्रमे 23 व 25 टक्के वाढ अपेक्षित आहे. तेलबियांच्या उत्पादनात मागील वर्षाच्या तुलनेत 22.7 टक्के घट होणार आहे. 2023 - 24 मध्ये फलोत्पादन पिकांखालील क्षेत्र 21.74 लाख हेक्टर अपेक्षित असून 326.88 लाख मे. टन उत्पादन अपेक्षित आहे.

2024-25 साठी राज्याची महसुली जमा 4 लाख 99 हजार 463 कोटी रुपये अपेक्षित तर महसुली खर्च 5 लाख 19 हजार 514 कोटी अपेक्षित

कर, महसूल आणि करेतर महसूल (केंद्रीय अनुदानासह) अनुक्रमे 4 लाख 19 हजार 972 कोटी आणि 79 हजार 491 कोटी अपेक्षित

2024 - 25 मध्ये जानेवारीपर्यंत प्रत्यक्ष महसुली जमा 3 लाख 81 हजार 80 कोटी रुपये ही रक्कम अर्थसंकल्पीय अंदाजाच्या 76.3 टक्के आहे.

अर्थसंकल्पीय अंदाजानुसार 2024-25 करता राज्याचा महसुली खर्च 5 लाख 19 हजार 514 कोटी अपेक्षित आहे.

स्थूल राज्य उत्पन्नाच्या तुलनेत कर्ज आणि व्याजापोटी 17.3 टक्के रक्कम खर्च होत आहे.

2024 -25 च्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार राजकोषीय तूट 2.4 टक्के, महसुली तूट 0.4 टक्के असणार आहे.

2024-25 साठी राज्याचा प्राधान्य क्षेत्रासाठीचा वार्षिक कर्ज आराखडा 7 लाख 25 हजार कोटी रुपये असणार आहे. त्यामध्ये कृषी क्षेत्राचा हिस्सा 24.4 टक्के आणि 'सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग' क्षेत्राचा हिस्सा 60.7 टक्के आहे.

राज्यात 2024 मध्ये सरासरी पावसाच्या 116.8 टक्के पाऊस

राज्यातील 203 तालुक्यांमध्ये अतिरिक्त, 68 तालुक्यांमध्ये सरासरी आणि 84 तालुक्यांमध्ये अपुरा पाऊस पडला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.