Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुण्यातील बहुचर्चित प्रकरण काय? बायको नाही तर चक्क आई-बापालाच द्यावी लागली 1,92,000 रुपयांची पोटगी

पुण्यातील बहुचर्चित प्रकरण बायको नाही तर चक्क आई-बापालाच द्यावी लागली 1,92,000 रुपयांची पोटगी
 

उतारत्या वयात आई-वडिलांचा सांभाळ करण्यासाठी मुलं टाळाटाळ करत असल्याच्या अनेक घटना दिवसेंदिवस समोर येत आहेत. अशातच पुण्यातील र्लक्ष करीत असल्याची दाद मागण्यासाठी न्यायालयाची पायरी चढलेल्या वृद्ध दाम्पत्याला अखेर पुण्याच्या कौटुंबिक न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. 'घराच्या आणि गाडीच्या कर्जाचे हप्ते भरावे लागतात. पत्नीला सांभाळावे लागते, या आधारावर मुलगा आपल्या आई-वडिलांकडे दुर्लक्ष करू शकत नाही', असं न्यायाधीश के. व्ही. ठाकूर यांनी म्हटलं आहे.

दरमहा 16 हजार रुपये पोटगी
 
'आई-वडिलांची काळजी घेणे ही मुलाची नैतिक व कायदेशीर जबाबदारी आहेच; तसेच त्यांची काळजी घेणेही बंधनकारक आहे,' अशा शब्दांत न्यायाधीश के. व्ही. ठाकूर यांनी या मुलाला दरमहा 16 हजार रुपये पोटगी देण्याचा निर्णय सुनावला आहे. या प्रकरणात वयाची 75 री ओलांडलेल्या दाम्पत्याने गत वर्षी मार्चमध्ये फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 125 नुसार, पोटच्या मुलाकडून पोटगी मिळण्यासाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला होता.

'आम्हाला जावयाकडे राहावं लागतंय'
अर्ज केलेल्या दाम्पत्याला तीन मुली व एक मुलगा आहे. मुलगा एका खासगी कंपनीत चांगल्या पगारावर कामाला आहे. 'आर्थिक परिस्थिती नसतानाही मुलाच्या शिक्षणावर खर्च केला. परंतु तो आता आमची काळजी घेत नाही. त्यामुळे आम्हाला जावयाकडे राहावं लागतंय. मला दरमहा तेराशे रुपये निवृत्तिवेतन मिळत असून, मधुमेह, हृदयरोग आणि मेंदूच्या पक्षाघाताचा त्रास आहे. मुलगा उच्चशिक्षित असून, दरमहा 80 हजार रुपये कमावत असतानाही आमच्याकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे आम्हाला पोटगी मिळावी, अशी मागणी ज्येष्ठ दाम्पत्याने केली होती.
आई-वडील मानसिक त्रास देतात- मुलाचा आरोप

वृद्धांच्या मुलाने हा अर्ज फेटाळून लावण्याची मागणी करताना आपल्यावर आई-वडिलांसोबत पत्नीचीही जबाबदारी असल्याचे म्हणणं मांडलं. आपल्याला दरमहा 60 हजार रुपये पगार मिळतो आणि 52 हजार 600 रुपये खर्च येतो. आई-वडील मानसिक त्रास देत असून ते मुद्दाम महागड्या रुग्णालयांत उपचार घेतात. मी आई-वडिलांचा घरखर्च आणि परवडणाऱ्या रुग्णालयाचा खर्च उचलण्यास तयार आहे, असं मुलाचं म्हणणं होतं. मात्र, न्यायलयाने वुद्धांच्या बाजूने निकाल दिला.
 
'स्वतःसाठी अलिशान कार'
'व्हर्टिगोचा त्रास असल्याने मुलाने स्वतःसाठी अलिशान चारचाकी घेतली; परंतु आई-वडिलांना महागड्या रुग्णालयात उपचार घेऊ नका, असे तो सांगतो. या वागण्यावरूनच तो आई-वडिलांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास येते. या दाम्पत्याने आयुष्यभर काबाडकष्ट करून मुलाला चांगले शिक्षण दिले. दुर्दैवाने, तो त्यांना साध्या रुग्णालयात उपचार घेण्यास सांगतो,' असेही न्यायालयाने निकालात नमूद केले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.