Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मोदींची महिलांसाठी भन्नाट योजना! २ लाखांचं कर्ज अवघ्या ५% व्याजदराने, काय आहेत अटी आणि नियम

मोदींची महिलांसाठी भन्नाट योजना! २ लाखांचं कर्ज अवघ्या ५% व्याजदराने, काय आहेत अटी आणि नियम
 

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने महिला उद्योजकांसाठी एक मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. स्वर्णिमा योजना अंतर्गत मागासवर्गीय महिलांना २ लाख रुपयांपर्यंतचं कर्ज अवघ्या ५% व्याजदराने दिलं जाणार आहे.

कोणतीही सुरुवातीची गुंतवणूक न करता स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची ही उत्तम संधी आहे. सामाजिक आणि आर्थिक सुरक्षेसाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळा मार्फत ही योजना राबवली जात आहे. ही योजना मोदी सरकारच्या 'आत्मनिर्भर भारत' आणि 'स्टार्टअप इंडिया' यांसारख्या उपक्रमांना पूरक असून, महिला उद्योजकांसाठी मोठी संधी ठरू शकते. महिला उद्योजकांनी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करावा! या योजनेसाठी अर्ज कसा करावा, काय आहेत नियम अटी जाणून घेऊया सविस्तर

योजनेची वैशिष्ट्ये

- ही योजना मागासवर्गीय  महिला उद्योजकांसाठी आहे.

- महिलांना ₹२ लाखांपर्यंतचे कर्ज फक्त ५% वार्षिक व्याजदराने मिळणार आहे.

- या कर्जाचा उपयोग स्वयंरोजगारासाठी करता येईल.

- या योजनेच्या अंतर्गत महिलांना स्वतः कोणताही भांडवली वाटा उभारण्याची गरज नाही. म्हणजेच, ₹२ लाखांपर्यंतच्या प्रकल्पांसाठी महिलांना स्वतःकडून पैसे गुंतवावे लागणार नाहीत.

फायदे

- कमी व्याजदरावर मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत मिळणार.

- मागासवर्गीय महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची सुवर्णसंधी.

- महिला सशक्तीकरणाला चालना मिळणार.

- समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील महिलांसाठी आर्थिक स्थैर्याची संधी.
पात्रता निकष

अर्जदार महिला असावी.

वय १८ ते ५५ वर्षांदरम्यान असावे.

महिला उद्योजक असावी (स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची तयारी असावी).

वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ₹३ लाखांपेक्षा कमी असावे.

अर्ज करण्याची प्रक्रिया (फक्त ऑफलाइन माध्यमातून)

१. नजीकच्या SCA कार्यालयात भेट द्या: इच्छुक महिलांनी राज्य वाहिनीकृत एजन्सी (SCA) च्या कार्यालयात जाऊन 'स्वर्णिमा योजना' साठी अर्ज भरावा. (तुमच्या जवळच्या SCA कार्यालयाचा पत्ता येथे पाहू शकता: https://nsfdc.nic.in/channel-patrners/scas)

२. अर्ज भरून माहिती द्या: अर्जामध्ये व्यवसायासाठी आवश्यक माहिती, व्यवसायाची संकल्पना आणि प्रशिक्षणाची आवश्यकता असल्यास ती नमूद करावी.

३. अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे सादर करा: अर्ज भरल्यानंतर तो SCA कार्यालयात आवश्यक कागदपत्रांसह सादर करावा. अर्जाची छाननी झाल्यानंतर संबंधित संस्थेकडून कर्ज मंजूर केले जाईल.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

- आधार कार्ड (ओळखपत्र)

- शिधापत्रिका 

- रहिवासी प्रमाणपत्र 

- जात प्रमाणपत्र  - आरक्षित प्रवर्गासाठी

- अर्जदार महिलेचा पासपोर्ट साईज फोटो

महिला सशक्तीकरणासाठी उत्तम संधी!

ही योजना मागासवर्गीय महिलांसाठी आर्थिक स्वायत्तता मिळवण्याची मोठी संधी आहे. कमी व्याजदरावर कर्ज घेऊन महिला आपला व्यवसाय सुरू करू शकतात आणि आत्मनिर्भर होऊ शकतात. इच्छुक महिलांनी लवकरात लवकर अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा!

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.