बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात एका प्रख्यात वैद्यकीय व्यावसायिकाचा एका महिलेशी अश्लील चाळे करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. हा व्हिडिओ जवळपास पाच महिन्यापूर्वीचा असल्याचं बोललं जातंय. चिखली शहरातील एका नामांकित रुग्णालयाच्या डॉक्टरने आपल्याच केबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले असताना महिलेशी अश्लील चाळे करताना या सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. हा व्हिडिओ आता दोन दिवसापासून चिखली शहर व परिसरात वायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
महिलेच्या नातेवाईकांनी दिला डॉक्टरला चोप
दरम्यान, याबाबत अद्याप पोलिसात कुठेही तक्रार दाखल झाली नसून रुग्णालयात काम करणाऱ्या व व्हिडिओ व्हायरल झालेल्या महिलेच्या नातेवाईकांनी डॉक्टरच्या रुग्णालयात जाऊन गोंधळ घातल्याचं समोर आलं आहे. संबंधित डॉक्टर रुग्णालयाला कुलूप ठोकून फरार झालेला आहे. त्यामुळे या प्रकरणी पुढे नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.