Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भारतातील प्रसिद्ध मेडिकल कॉलेजमध्ये CBI चा छापा, रुग्णालयातील मोठ्या अधिकाऱ्याला ठोकल्या बेड्या

भारतातील प्रसिद्ध मेडिकल कॉलेजमध्ये CBI चा छापा, रुग्णालयातील मोठ्या अधिकाऱ्याला ठोकल्या बेड्या
 

मुंबई : भारतातील एका प्रसिद्ध मेडिकल कॉलेजमध्ये अचानक सीबीआयच्या छाप्याने खळबळ उडाली आहे. या तपासात थेट एका मोठ्या अधिकाऱ्याला अटक करण्यात आली, ही बातमी रुग्णालयात पसरली आणि हळूहळू सर्व देशापर्यंत देखील पोहोचली.

केंद्रीय तपास संस्थेने थेट रुग्णालयात प्रवेश करत सुविधा व्यवस्थापक देवव्रत दास यांना अटक केली. या घटनेमुळे संपूर्ण रुग्णालयात गोंधळ उडाला आहे. सीबीआयच्या सूत्रांच्या माहितीनुसार, अभिजीत दास यांच्यावर भ्रष्टाचाराच्या एका जुन्या प्रकरणाचा तपास सुरू होता. या प्रकरणात त्यांना याआधी अटकही झाली होती. आश्चर्याची बाब म्हणजे, अवघ्या चार महिन्यांपूर्वीच त्यांनी मालदा मेडिकल कॉलेजमध्ये सुविधा व्यवस्थापक म्हणून कार्यभार स्वीकारला होता.
मालदा मेडिकल कॉलेजमध्ये रुजू होण्यापूर्वी अभिजीत दास यांनी अलीपूरद्वार, सागर दत्ता मेडिकल कॉलेज आणि बरानगर स्टेट जनरल हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या पदांवर काम केलं होतं. मात्र, त्यांच्याविरोधातील भ्रष्टाचार प्रकरण अद्याप सुरू होतं. सीबीआयच्या माहितीनुसार, अभिजीत दास यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, त्यांनी ते आदेश पूर्णपणे धुडकावले. त्याच दरम्यान, सीबीआयने मोठी कारवाई करत त्यांना ताब्यात घेतलं.

दुपारच्या सुमारास सीबीआयचे अधिकारी, उपनिरीक्षकाच्या  नेतृत्वाखालील पथक मालदा मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचले. त्यावेळी अभिजीत दास हे रुग्णालयाच्या प्रशासनिक विभागात आपल्या ऑफिसमध्ये होते. रुग्णालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर, सीबीआयने थेट कार्यालयातच छापा टाकला आणि अभिजीत दास यांना अटक केली. काही वेळातच ही बातमी संपूर्ण रुग्णालयात वाऱ्यासारखी पसरली आणि कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं.

मालदा मेडिकल कॉलेजचे अधीक्षक आणि उपप्राचार्य प्रसेनजित बोर यांनी सांगितलं की, "सीबीआय हे प्रकरण तपासत होती आणि न्यायालयाने अटकेसाठी वारंट जारी केले होते. त्यामुळे कारवाई झाली." मात्र, त्यांनी या भ्रष्टाचार प्रकरणाच्या सविस्तर तपशीलावर भाष्य करणं टाळलं. हा छापा केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित आहे का, की या प्रकरणाशी आणखी काही मोठी नावं संबंधित आहेत? हे तपासानंतरच स्पष्ट होईल. मात्र, सीबीआयच्या या कारवाईने रुग्णालय प्रशासनात मोठी खळबळ माजली आहे. पुढील तपास सुरू आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.