पुणे : महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी पुण्यात बौद्ध अनुयायांचा विराट मोर्चा काढण्यात आला. महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समिती, पुणेच्या वतीने आयोजित या महामोर्चात मोठ्या संख्येने बौद्ध अनुयायी सहभागी झाले होते.
बिहार मधील बूद्धगया येथे तथागत भगवान गौतम बुद्धांचे हजारो वर्षापासूनचे विहार आहे. मात्र, त्याचा ताबा बौद्धेतर विशेषत: ब्राम्हणी धर्मपंडितांकडे आहे. या गोष्टीचा जगभरातून निषेध होत असून महाबोधी विहाराचे व्यवस्थापन हे बौद्ध अनुयायांच्या देखरेखी खाली कार्यान्वित करण्यात यावे, अशी मागणी होत आहे. सध्या बुद्धगया येथे जगातील बौद्ध भिख्खूंचे प्रतिनिधी आंदोलन करीत आहेत. याच महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बालगंधर्व ते अलका चौक दरम्यान बौद्ध समाजाचा महामोर्चा काढण्यात आला. अलका चौकात सभा घेऊन मोर्चाचा समारोप करण्यात आला. यावेळी राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री कार्यालय व जिल्हाधिकारी यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल यांनी निवेदन स्वीकारले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.