मिरज : मिरज शहरात सहायक प्राध्यापकाने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपविले. बाळकृष्ण अनिल शिंदे (वय 26, रा. टाकळी रस्ता, मिरज) असे मृताचे नाव आहे. त्यांनी टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण समजू शकले नाही.
त्यांचे दोनच महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. शिंदे हे मिरज शहरातील महाविद्यालयात सहायक प्राध्यापक होते. गुरुवारी रात्री त्यांनी राहत्या घरी गळफास घेतला. हा प्रकार लक्षात येताच नातेवाईकांनी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले; परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. जीवन संपविण्यापूर्वी प्रा. शिंदे यांनी इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली होती. याप्रकरणी मिरज शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.