मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात हारवणारे फोटो समोर आले आहेत. त्यामुळे अवघ्या महाराष्ट्रात या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले. पण आता सीआयडीने या प्रकरणी 1500 पानाचं आरोपपत्र दाखल केलं. यामध्ये संतोष देशमुख यांना मारहाण करताना व्हिडीओ तपास यंत्रणेच्या हाती लागले. त्यातील काही फोटो आरोपपत्रातून समोर आले आहेत. हे फोटो पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. अशातच आता बीड बंदची हाक देण्यात आली आहे.
तगडा पोलीस बंदोबस्त तैनात
आरोपींच्या राक्षसी कृत्यामुळे समाज माध्यमावर प्रचंड रोष व्यक्त केला जात असताना आता त्याचे पडसाद म्हणून बीडमध्ये कडकडीत बंद पुकारण्यात आलाय. बीड बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून देखील तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच बीड पोलिसांनी जनतेने कायदा हातात घेऊ नये, असं आवाहन केलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत बीड पोलिसांनी जनतेला आवाहन केलंय.
बीड पोलिसांचं जनतेला आवाहन
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरणात गुन्हे अन्वेषन विभाग यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं आहे. आज 3 मार्च रोजी तपासाचा भाग असलेले काही फोटो टीव्ही चॅनेलवर तसेच समाज माध्यमांवर प्रसारित/व्हायरल झाले आहेत. सदरील फोटो हे मन विचलित करणारे आहेत. त्यामुळे व्हायरल फोटोंवरून समाज माध्यमांवर जनतेच्या प्रतिक्रीया उमटत आहेत. सदर प्रकरण हे आता न्यायप्रविष्ट असून सदर फोटो हे न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे. त्यामुळे जनतेने कायदा हातात घेऊ नये, असं आवाहन पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी केलं आहे.
संतोष देशमुखांना अमानुषपणे मारहाण
दरम्यान, संतोष देशमुखांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली. त्यांना विवस्त्र करून मारण्यात आले. हे फोटो पाहिल्यानंतर आरोपींनी अमानुषपणाचा कळस गाठला आहे. संतोष देशमुखांना मारहाण केल्यानंतर एकाने संतोष देशमुखांची पॅन्ट काढली, एकाने शर्ट काढला त्याच्या अंगावर बसले. संतोष देशमुख यांना मारहाण करण्यात आली होती, त्यावेळी आरोपी सुदर्शन घुले हा स्पष्टपणे दिसून येत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.