Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Breaking News! धनंजय मुंडेंना मंत्रिपदच द्यायला नको होतं, राजीनामा आधीच द्यायला हवा होता : पंकजा मुंडे

Breaking News! धनंजय मुंडेंना मंत्रिपदच द्यायला नको होतं, राजीनामा आधीच द्यायला हवा होता : पंकजा मुंडे
 

धनंजय मुंडे यांचा राज्याच्या अन्नपुरवठा मंत्रीपदावरून अखेर राजीनामा घेण्यात आला .गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात सोमवारी समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या पाशवी हत्येच्या अमानुष फोटो आणि व्हिडीओने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे .

दरम्यान खासदार पंकजा मुंडे  यांनी धनंजय मुंडेंना मंत्रिपदच द्यायला नको होतं . राजीनामा आधीच द्यायला हवा होता अशी प्रतिक्रिया दिली आहे . धनंजय मुंडे  यांच्या राजीनाम्यावरून महाराष्ट्रात काय चाललंय हे नागपूर मध्ये माहित नसल्याचे सांगत या संपूर्ण प्रकरणावर त्या व्यक्त झाल्या .या प्रकरणात कोण आहे काय नाही कोण सहभागी आहे हे यंत्रणेलाच माहीत आहे .त्यात हस्तक्षेप करण्याचं कारण नाही असेही पंकजा मुंडे म्हणाल्या .

काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
महाराष्ट्रात, मुंबईत काय चाललेय ते नागपूरमध्ये माहिती नव्हतं. इन्स्टाग्रामवरची पोस्ट बघून मुंबईत काय चाललेय ते माहिती आहे. मी जे व्यक्त होत आहे त्याचा सन्मान ठेवावा, हा विषय अत्यंत मानवी विषय आहे. माणुसकीचा विषय आहे. संतोष देशमुख यांना मारण्याच्या संदर्भातले काही व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाले .त्यातली एक पोस्ट मी पाहिली .हे व्हिडिओ उघडण्याची हिंमत झाली नाही .ज्यांनी त्यांना एवढ्या अमानुषपणे मारला आहे .मारून त्याचा व्हिडिओ केला आहे .त्यांच्यात जेवढी अमानुष्यता आहे ही अमानुषता पाहण्याची माझ्यात हिंमत नाही .देशमुखांचा हत्यानंतर मी पहिल्यांदा मुख्यमंत्री महोदयांना पत्र दिलं होतं आणि १२ डिसेंबरला मी याच्यावर संपूर्ण भाषण आज आपण पहा ऑनलाईन आहे मी व्यक्त झालेली आहे आता यामध्ये कोण आहे काय नाही कोण आहात हे केवळ आणि केवळ तपास यंत्रणेलाच माहिती आहे त्यामध्ये कुठलाही हस्तक्षेप मी करण्याचे कारण नाही एवढे मात्र नक्की सांगते .ज्या मुलांनी ही हत्या केली आहे . त्यांच्यामुळे संपूर्ण राज्यातील समाज ज्यांचा काहीही दोष नाही तो समाज मान खाली घालून गंभीरपणे वावरत आहे .इतकी निर्घृण हत्या झाली हे पाहून समाज आक्रोशात वावरत आहे .समाज आणि जात यावर बोलायची गरज नाही पण परिस्थितीच अशी आहे .

खरंतर समाज आणि जात यावर बोलायची गरज नाही, आता प्रत्येक गोष्ट जातीवर जाते,अमानुषपणे कोणाला संपवणाऱ्याला कोणतीही जात नसते. त्याच्यावर निर्णय घेणाऱ्या राज्यकर्त्याला जात नसली पाहिजे. जेव्हा या खूर्चीवर बसले तेव्हा मी शपथ घेतली आहे आमदारकीची शपथ घेतली, कुठलाही ममत्व भाव न बाळगता कुणाविषयी कुठलाही आकस द्वेष न बाळगता काम करायला पाहिजे यावर मी ठाम आहे. संतोष देशमुखांच्या निघृण हत्येवर निषेध व्यक्त करताना मी मनापासून त्यांच्या आईची क्षमा मागते. कारण, ज्या मुलांनी निघृण हत्या केलीय ते माझ्या पोटचे असते, पदरात असते तर त्यांना कडक शासन करा असं म्हटलं असतं.

धनंजय मुंडेंचा राजीनामा झालाय, त्याचं स्वागत व्हायला पाहिजे. हा राजीनामा फार आधी व्हायला पाहिजे होता. हा राजीनामा पेक्षा शपथचं नाही व्हायला पाहिजे होती. तर कदाचित पुढच्या गोष्टींना सामोरं जावं लागलं नसतं. घेणाऱ्यांनी आधी घ्यायला हवा होता, धनंजयनं पण आधी द्यायला हवा होता. सन्मानाचा मार्ग मिळाला असता, त्यानं सांगितलं असेल त्याचं स्टेटमेंट काय असेल. जेव्हा आपण खूर्चीवर बसून विचार करतो तेव्हा राज्याचा प्रत्येकाचा सारखा विचार केला पाहिजे. त्या परिवाराच्या, जीवाच्या वेदनांपुढं काही मोठा निर्णय नाही. धनंजय मुंडेंनी घेतलेला निर्णय देर आये दुरुस्त आये. असंही त्या म्हणाल्या.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.