महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नितेश राणे यांनी हिंदू समाजातील खाटीकांसाठी 'मल्हार सर्टिफिकेशन' योजना सुरू केल्याची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत फक्त हिंदू खाटीकांना अधिकृत प्रमाणपत्र दिले जाणार आहे. मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम (https://MalharCertification.com) या
पोर्टलच्या माध्यमातून हे प्रमाणपत्र वितरित केले जाईल, अशी माहिती त्यांनी
दिली आहे. नितेश राणे यांनी त्यांच्या 'एक्स' (Twitter) अकाऊंटवरून पोस्ट
करत यासंबंधी सविस्तर माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की, हिंदू
समाजासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.
मल्हार सर्टिफिकेशन मिळालेल्या दुकानांमध्येच 100% हिंदू व्यापारी व खाटीक असतील, तसेच येथे विकले जाणारे मांस शुद्ध आणि भेसळमुक्त असेल. त्यामुळे लोकांनी अशाच दुकानांमधून मटण खरेदी करावे आणि जिथे हे सर्टिफिकेशन नसेल, तिथून खरेदी टाळावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. नितेश राणे यांनी सांगितले की, या
योजनेच्या माध्यमातून हिंदू समाजातील तरुणांना आर्थिकदृष्ट्या सक्षम
होण्याची संधी मिळेल. मल्हार सर्टिफिकेशनच्या मदतीने हिंदू खाटीकांना
अधिकृत मान्यता आणि व्यवसायात प्रोत्साहन मिळेल. मात्र, त्यांच्या या
घोषणेमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.