सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. धनंजय मुंडेंच्या राजीनामा देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात गुन्हे अन्वेषण विभाग यांनी न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले आहे. यादरम्यान तपासाचा भाग असलेले काही फोटो माध्यमांवर प्रसारित झाले. सदरील फोटो मनविच्छलित करणारे आहेत. त्यामुळे वायरल फोटो वरून समाज माध्यमांवर जनतेच्या प्रतिक्रिया उमटत आहे. तर मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जातेय. ती आता मान्य झाली असून धनंजय मुंडेंना राजीनामा देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या 'देवगिरी' बंगल्यावर सोमवारी (ता.3) रात्री महत्त्वाची महत्वाची बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस स्वतः अजित पवारांच्या बंगल्यावर हजर होते. या बैठकीत अजित पवार धनजंय मुंडे आणि सुनिल तटकरेही उपस्थित होते. 'देवगिरी'वर झालेल्या बैठकीत तब्बल दीड तास या चौघांमध्ये चर्चा झाली. ज्यामध्ये मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी धनजंय मुंडे यांना राजीनामा देण्याचे आदेश दिल्याचे सांगण्यात येत आहे.
सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करतानाचे फोटो माध्यमांवर प्रसिद्ध झाले. त्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. तर धनंजय मुंडे यांच्या सरकारमध्ये असल्याने सरकारची छवी मलीन होत असल्याचा सूर देखील सत्ताधाऱ्यांमध्ये उमटत होता. मात्र गुन्हा सिद्ध झाल्याशिवाय यांचा राजीनामा घेता येणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याआधी बोलत मुंडेंच्या कारमान्यांवर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला होता. पण आता देशमुख यांची हत्या करतानाचे फोटो माध्यमांवर प्रसिद्ध झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंडेंना राजीनामा देण्याच्या सूचना केल्या आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.